प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
ग्रामसभेला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार दांडी मारणे आणि ग्रामसभा न घेणे,कामे न करता रुपयांची उचल करणे,ही बाब अतिशय गंभीर असल्याने आज ग्रामसभेच्या दिवसी ग्रामस्थानी कोटगाव गटग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.घनश्याम उके यांना ग्रामपंचायत मध्ये कुलूपबंद केले आहे.
चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून सुध्दा ते तक्रारींचे निवारण करीत नसल्याची ओरड ग्रामस्थांची आहे.
यामुळे चिमूर प.स.चे गटविकास अधिकारी आल्याशिवाय ग्रामसेवक यांना कुलूपमुक्त करणार नसल्याचा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
कामे न करता रुपयांची उचल केल्याची ओरड ग्रामस्थांची आहे.यामुळे चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गटग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असल्याची चर्चा रंगली आहे.



