दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादक
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी अपघाती निधन झाले.बारमती धावपट्टी जवळच विमानाचा अपघात झाला व या विमान अपघातात त्यांचे दुदैवी निधन झाले आणि महाराष्ट्र राज्यात शोककळा पसरली.
त्यांच्या पार्थिवाचे आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यांच्या अंत्यसंस्काराला भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह,माजी मुख्यमंत्री,अनेक आजी माजी मंत्री,खासदार,आमदार,जेष्ठ तथा पक्ष पदाधिकारी,सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तीं उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,काका असलेले माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार व इतर आजी माजी खासदार,आमदार,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य नेते,पक्ष पदाधिकारी,काल आलें होतें व आज येणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी खासदार सुमित्रा पवार,खासदार सुप्रिया सुळे,चिरंजीव पार्थ पवार हे दिल्लीवरून बारामतीत कालच आले आहेत तर आमदार रोहित पवार हे दुःखद् घटनाक्रमावर लक्ष केंद्रित करून आहेत.याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व नातेवाईक बारामती येथे पोहोचेल आहेत.
अपघातग्रस्त विमानात उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या सह कॅप्टन सुमित कपूर,कॅप्टन शांभवी पाठक, अजितदादा पवार यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव,फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी,हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते.त्यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते.बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लॅंडिंग करताना विमान अपघात झाला.
प्रतिक्रिया….
अजित पवार यांचा अकाली मृत्यू हा प्रचंड मोठा धक्का आहे.एक कर्तूत्वान,निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे,अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज पोरका झाला आहे.जे काही नुकसान झाले ते भरुन निघणार नाही.पण,सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात…



