वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची नागपूरला आज महारॅली… –चिमूर,ब्रम्हपुरी,वरोरा,राजूरा, चंद्रपूर,राजूरा,बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून जाणार हजारो कार्यकर्ते,धावणार हजारो गाड्या.. — विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा भरभरून असणार सहभाग.. –“हैं तैयार हम,महारैली….

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

            राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात विशाल रॅलीचे आयोजन आज करण्यात आले आहे.मुजोरशाही विरोधात लढण्यास व संघर्ष करण्यास,”है तयार हम,या स्लोगनानुसार रॅलीत सहभागी झालेले लाखो पदाधिकारी व कार्यकर्त्ये संकल्प सोडणार असल्याचे दिसून येते आहे.

       या रॅलीत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया,वर्धा,यवतमाळ,वाशिम,अकोला, बुलढाणा, अमरावती,नागपूर जिल्ह्यातून कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा नागपूरकडे रवाना झाला आहे व रवाना होणार आहे.

       विशेषतः चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर,ब्रम्हपुरी,वरोरा,राजूरा, विधानसभा मतदारसंघातून हजारो गाड्यांचा ताफा नागपूरकडे रवाना होण्यासाठी कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची लगबग नियोजनबद्ध आहे.

         याचबरोबर अख्या देशातून पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहेत.

          आज होणाऱ्या पक्षाच्या विशाल वर्धापन रॅली दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

                राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा व खासदार श्रीमती सोनिया गांधी,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी,माजी विधानसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार व राष्ट्रीय,राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत,”आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन,”महारैली,अंतर्गत नागपूर येथे साजरा करण्यात येतो आहे.

          या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे व इतर सर्व सेलचे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्तागण देशभरातून नागपूर नगरीकडे रवाना झाले आहेत,पोहोचले आहेत.

                या महारैलीला देशभरातून १० लाखांच्या वर पक्ष पदाधिकारी,कार्यकर्तागण उपस्थित राहणार असल्याचे संकेत असल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

               महारैलीचे प्ररंभीक स्थळ भारत जोडो मैदान दिघोरी नाका नागपूर असे आहे.

             मुंबई येथे सन २८ डिसेंबर १८८५ ला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली.मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र आले होते व बैठकी नंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची त्यांनी स्थापना केली होती.स्थापने नंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष वोमेश चंद्र बॅनर्जी हे झाले होते.वर्तमान स्थितीत खासदार मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

          आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाटचालीला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत व १३९ व्या वर्षात पक्ष पदार्पण करतो आहे.

         राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर श्रिमती सोनिया राजीव गांधी या सर्वाधिक काळ विराजमान होत्या.अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्थीचे प्रयत्न केले.यामुळेच देशाची सत्ता २००४ ते २०१४ पर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे होती.

              राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,वरिष्ठ नेत्या तथा मार्गदर्शक श्रीमती सोनिया गांधी व पक्षाचे आधारस्तंभ खासदार राहुल गांधी व इतर सर्व वरिष्ठ पक्ष पदाधिकारी,आजी माजी मुख्यमंत्री,मंत्री,कार्यकर्तागण हे देशभरातून वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महारैलीला नागपूरला येत असल्यामुळे आजच्या महारैलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.