केंद्र व राज्य सरकारच्या कामगार किसान विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आयटक च्या नेतृत्वात वडसा येथे कामगार संघटनानची तीव्र निदर्शने….

प्रितम जनबंधु

    संपादक 

    देसाईगंज :- देशातील नागरिकांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, किसान विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील प्रमुख संघटनांनी 26 नोव्हेंबर संविधान दिना पासून देशव्यापी आंदोलन पुकारले आहे त्या अनुषंगाने आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथील स्थानिक हुतात्मा स्मारक समोर 27 नोव्हेंबर (सोमवार) ला दुपारी 2 वाजता कामगार संघटनांनी तीव्र निदर्शने करून करून केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व किसान विरोधी धोरणाचा निषेध केला.

          आयटकच्या वतीने विविध मागण्यां करण्यात आल्या ज्यामधे स्मार्ट प्री पेड विज मीटर, समुह शाळा, शाळा दत्तक योजना मागे घ्या, शेतमालाला हमी भावाचा कायदा करा, अंगणवाडी, आशा गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान 26 हजार वेतन लागू करून सामाजिक सुरक्षा द्या, व शासकीय कर्मचाऱ्यांचा चार श्रम कोड रद्द करून २९ कामगार कायदे पुर्ववत लागु करा, मागासवर्गीय बॅकलाग व पदोन्नती ची पदे ताबडतोब भरा, वनहक्काचे प्रलंबित वनहक्क दावे निकालात काढा, जुनी पे॑शन योजना लागू करा. 

        ईपीएस- ९५ सर्व पे॑शन धारकांना ९ हजार रुपये मासिक पे॑शन लागु करा. स्पर्धा परिक्षेची राजस्थान शासनानुसार फि कमी करून सेवा सुविधा लागु करा. के. जी. ते पी. जी. पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत द्या. या समस्त मागण्यांना घेऊन पुढील देशव्यापी आंदोलन तीव्र केल्या जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.

            तसेच आयटक च्या नेतृत्वात 20 नोंहेंबर पासून मोदी हटाव, देश बचाव,संविधान बचाव, या मागणीला घेऊन कोल्हापूर पासून संघर्ष यात्रा सुरू झाली असून ही संघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्र फिरत 15 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे आगमन होणार आहे.

           या संघर्ष यात्रेचा जोरात स्वागत करण्यासाठी 15 डिसेंबर रोजी गोंडवाना भवन पोटेगाव रोड ते गांधी चौक पर्यंत सकाळी 12 वाजता विराट रॅली काढून सभा घेण्यात येणार आहे तेव्हा आयटक संलग्न सर्व कर्मचाऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयटक चे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन चे कॉ.कुंदा कोहपरे, अशोक सोनवणे, नाजरीन पठाण, आनंद धाकडे, प्रमिला खरकाटे, भारती चनेकर, आशा राखडे, छाया गुरू, छाया ठाकरे, अंगणवाडी युनियनचे, कॉ. राधा ठाकरे, मीनाक्षी झोडे, रशिका कुथे, मिरा बांगरे, कांता फटीग, नेहा शहारे, रंदई व आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेचे ज्योत्सना रामटेके यांनी केले आहे.