ग्रंथालयाच्या समस्या सोडविण्याचा शासन दरबारी प्रयत्न करणार – आ.किर्तीकुमार भांगडिया.. — भिसी येथील जिल्हा ग्रंथालय वार्षिक अधिवेशन समारोह..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :-

           तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय भिसी व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने भिसी येथील श्री.विठ्ठल रूखमाबाई देवस्थानचे सभागृहात वार्षिक ग्रंथालय अधिवेशन समारोहाच्या उ‌द्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार किर्तिकुमार भांगड़िया म्हणाले की,नविन ग्रंथालय शासन मान्यता,अनुदान वाढ करणे,ग्रंथपाल व कर्मचारी वेतन श्रेणी,ग्रंथालय वर्ग बदल आणि अन्य सर्व समस्या शासन दरबारी मांडुन सोडविण्याचा प्रयत्न करणार असे शब्द ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिले.

         कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये उद्घाटक आ. किर्तिकुमार भांगडीया,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार,प्रमुख अतिथी सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपुर रत्नाकर नलावडे,शिवकुमार शर्मा,जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंदपुर रत्नरक्षित शेंडे,अनिल बोरगमवार,भाऊराव पन्नी,चंद्रकांत पानसे,सुभाष शेषकर,मारोती राऊत,वर्षा लोणकर,लता लाकडे,आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

          द्वितीय सत्रामध्ये डॉ गजानन कोटेवार,चिमुर विधानसभा समन्वयक तथा जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर,राष्ट्रवादी कांग्रेसचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (ओबीसी विभाग) धनराज मुंगले आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले व यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

        ग्रंथालय वार्षिक अधिवेशन कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय भिसीचे सहसचिव प्रकाश मेश्राम यांनी प्रास्ताविक केले व सुत्र संचालन केले.ग्रंथालय जिल्हा अधिवेशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव शामराव रामटेके आणि सर्व पदाधिकारी,हितचिंतक यांनी श्रम घेतले.