खासदारांच्या वृंदावनातील माती अमृत कलशात.. — देशाप्रती खासदार दांपत्यानी व्यक्त केली कृतज्ञता…

प्रितम जनबंधु

  संपादक 

           भंडारा:– मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत भंडारा नगर परिषदेच्या वतीने अमृत कलश यात्रा भंडारा शहरात करण्यात आली. यावेळी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी यात्रा पोहोचल्यानंतर त्यांनी सपत्नीक, तुळशी वृंदावनातील माती कलशात टाकून देश आणि क्रांतिवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

             देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत देशभरातील प्रत्येक गावातील पवित्र माती गोळा करून दिल्ली येथे एकत्र केले जाणार आहे. त्यासाठी अमृत कलश यात्रा काढल्या जात आहेत.

                  प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत. भंडारा शहरातही नगर परिषदेच्यावतीने यात्रा काढली गेली. नगरातील प्रमुख मार्गाने भ्रमंती करीत घराघरातून माती गोळा केली गेली. 

खा सुनील मेंढे यांच्या घरी यात्रेचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.

              खा. सुनील मेंढे व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी यांनी घरातील तुळशी वृंदावनातील पवित्र माती आणलेल्या अमृतकलशात टाकून मातृभूमी प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. अमृत कलश यात्रेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील भूमिका त्यांनी विषद केली. 

            यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, भाजपा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, जिल्हा महामंत्री आशु गोंडाने, महेंद्र निंबार्ते, रोशन काटेखाये, साधना त्रिवेदी, भूपेश तलमले, तुषार काळबांधे, प्रशांत निंबोळकर, अमित बिसने, सूर्यकांत इलमे, प्रवीण पडोळे, वेदांत निंबार्ते, मुकेश कापसे, अनिकेत तुरगावळे, संगीता कापगते, मुस्ताक शेख, दिनेश भवसागर, प्रवीण वायन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.