बल्लारपूर – चंद्रपूर बायपास मार्गावर भरधाव ट्रक चक्क रिक्षावरच उलटला…. — भीषण अपघातात चारजण चिरडले….. — रिक्षा चालकासह प्रवाशांचा हकनाक बळी…

प्रितम जनबंधु

  संपादक 

              राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. बुधवारी बल्लारपूर – चंद्रपूर बायपास मार्गावर भरधाव ट्रक उलटून बाजुने प्रवासी घेउन जाणाऱ्या एका ऑटोवर कोसळला. या भीषण अपघातात रिक्षामधील चार चणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमीक माहीती प्राप्त झाली आहे.

           सदर अपघाची घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. संगीता चाहांदे वय ५६ वर्ष रा. गडचिरोली, अनुष्का खेरकर वय २२ वर्ष रा. बल्लारपूर, ऑटो चालक इरफान खान, प्रभाकर लोहे अशी मृतांची नावे आहेत. बातमी लिहेस्तोवर एका मृताची ओळख अद्याप पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

            बल्लारपूर-चंद्रपूर बायपास मार्गावर अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणारा ट्रक शेजारून जाणाऱ्या एका रिक्षावर उलटला व बाजुने जाणारा रिक्षा ट्रकखाली चिरडला गेल्याने त्यातून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस विभागाचे अधिकारी करीत आहेत.