रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी…
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
दि १ जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत, मा. सहसचिव तथा राष्ट्रीय अभियान संचालक तथा केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्यमंत्रालय, भारत सरकार, यांचे संदर्भीय पत्रानुसार चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, इतर शासकीय जागा इत्यादी ठिकाणी “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” उपक्रम राबविणे बाबत निर्देशित केलेले आहे.
या निर्देशाला अनुसरून ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत, मोहिमेचे सहा प्रमुख मंत्र, म्हणजेच स्वच्छ हात, स्वच्छ घरे, स्वच्छ परिसर, स्वच्छ शौचालये तथा स्वच्छ नाले आणि जलसाठे या विषयांवर महाविद्यालयात आणि परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बिजनकुमार शिल यांच्या देखरेखीखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाच तुकडी पाडण्यात आली, आणि त्यांच्याद्वारे स्वच्छता आणि जनजागृती करिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
या तुकड्यांचे नेतृत्व रासेयो स्वयंसेवक, कु.गौरी चंदनखेडे, श्री.दिलराजसिंग अंधेरेले, श्री.मुकेश भिमटे, श्री. प्रज्वल झाडे आणि कु.संचिता वैद्य हे करत आहेत. या अभियानाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सहभाग लाभत आहे.



