Home Social भिसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मंगेश भोंगाडे यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार...

भिसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मंगेश भोंगाडे यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा चिमूरच्या पदाधिकाऱ्यांद्वारे मनःपूर्वक स्वागत!…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

चिमूर : – चंद्रपूर जिल्हातंर्गत भिसी अप्पर तालुका ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी म्हणजे ठाणेदार म्हणून रुजू झालेल्या श्री.मंगेश भोंगाळे याचे पुष्पगुच्छ देऊन चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आज मनःपुर्वक स्वागत करण्यात आले.

       ठाणेदार जितेंद्र चहांदे यांच्या जागेवर,चंद्रपूर शहर पोलीस ठाणे येथून बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे भिसी पोलिस स्टेशनला नुकतेच रुजू झाले आहेत.

        त्यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा – चिमूर तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात आणि आवश्यक हितगुज केले..

          यावेळी डिजिटल मीडिया जिल्हा सचिव तथा म.रा.प.संघ मुंबई तालूका अध्यक्ष केवलसिंग जुनी,तालूका संघटक विलास मोहिणकर,तालुका सचिव उपक्षम रामटेके,सहसंघटक सदस्य सुनील हिंगणकर,तालुका कोषाध्यक्ष समीर बल्की उपस्थित होते.