रामपूर(चक) जनतेने लोकवर्गणीतून मजुरी करून जगणाऱ्या सुधीरला उपचारासाठी पाठवली वर्धेला रक्कम… — सामाजिक बांधिलकी जपतच गावकऱ्यांनी दाखवली माणुसकी…

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी:-

         मोलमजुरी करून कुटुंब चालविणारा सुधीर माकडे रामपूर चक येथील रहवाशी असून प्रत्येकाचे काम करणारा सुधीर शुक्रवारी शंकर माकडे यांच्या सोबत शेतातील झाडाच्या फांद्या तोडतांना झाडावरून खाली पडला त्यामुळे त्याच्या छातीला व मानेला जबर मार लागला.शंकर माकडे यांनी प्रसंगावधान साधून त्याला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेला पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सुधीर यांचा भाऊ सोमेश्वर माकडे व पुतण्या लोकेश माकडे यांनी स्वतःच्या गाडीवर दत्ता मेघे सावंगी येथे उपचारासाठी नेले त्यात सुधीर यांचा मानेची शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्कम जमा करावी लागत होती पण सुरवातीला त्यांच्या जवळ पैसे कमी असल्याचे गावकऱ्यांना माहिती झाल्यावर शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी स्पीकर मध्ये घोषणा करून गावातून लोकवर्गणी जमा केली.

       लोकवर्गणी जमा करण्यासाठी गावातील नवतरुण जमा झाले त्यात माकडे परिवार यांनी मदत केली गावातून कुणी 100 रु 200रु अश्या प्रकारे रक्कम जमा केली. सुधीर माकडे हा गावामध्ये कोणताही कार्यक्रम असला की स्वयंपाक करण्यासाठी जायचा.मजुरी करून जगणारा सुधीर कार्यक्रमात निस्वार्थ पणे सेवा करायचा.त्याला तीन मुली लहान आहेत.त्याची प्रकृती ठीक व्हावी यासाठी गावकरी प्रार्थना करत आहे.

       रामपूर चक येथील गावकरी गावातील कुणी मरण पावल्यावर लोकवर्गणी जमा करतात असे 10 ते 15 वर्षांपासून सुरू आहे त्यात असे अपघात झाल्यावर उपचारासाठी लोकवर्गणीतून उपचार चांगला करण्यात यावा यासाठी रामपूर वासीय समोर येतात.