सावधान ! बिनव्याजी कर्ज मिळतोय म्हणून गडचिरोली शहरात फिरत आहेत एजंट _ पोलिस लक्ष देणार काय?

 

ऋषी सहारे

संपादक

 

 गडचिरोली _ आमच्या कंपणीत बिनव्याजी कर्ज मिळतो म्हणुन गडचिरोली जिल्ह्यात असे महिला व पुरुष ऐजंन्ट फिरत आहेत. 

         सर्व प्रथम पाच हजार रुपये भरून सभासद व्हायचे आहे व आपणच दोन सभासद करायचे आहेत म्हणजे एकंदरीत कंपणीत १५ हजार रुपये भरायचे आहेत. त्यानंतर अनेक कागदपत्र कंपणीला जमा करायचे व दहा महिन्यानतर २५ ते एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज आपल्या I D वर पाठवितो असे एंजन्ट सांगत आहेत.

         ऐकावे ते नवलंच! देशात अशी बिनव्याजी कर्ज देणारी कंपणी आहे.असे कुणालाही आठवत नाही.( मुनिश्वर बोरकर ) २५ वर्षापूर्वी संचयनीने लोकांना डुबविले सर्वांना माहीतच आहे,

        त्यांनतर ट्रेंटविल कंपणी आली तेही नागरिकाना लुटून गेली.त्यानंतर कलकाम कंपणी आली एक लाख भरा तिन महिण्यात दोन लाख देतो या कंपणीच्या एजन्टांनी लाखो लोकांनां डुबविले.रामनगर वासीय आजही बोंबलत आहेत. 

        मैत्रीय कंपनीने सुध्दा लाखो लोकांना डुबविले. नागरिक लालसेपोटी झटपट श्रीमंत होईन म्हणून लाखो लोक लाख लाख रुपयाने फसले. 

          १० वर्षापूर्वी R C M. ( डेली निड रिर्टन शॉपी ) कंपणी आली होती.अनेक महिला एजंन्टानी अडीच हजारात कंपणी ड्रेस देतोय व दुकानातुन स्वस्त दरात डेली निडस ” सामान मिळतो म्हणून अनेक महिला एजन्टांनी अनेक सभासदांना फसविले.यात रामनगरच्या सामाजीक कार्य करणाऱ्या महिला एंजन्ट सुद्धा आघाडीवर होत्या. 

          टु स्टॉर हाॅटेल मधे सभासदांना जेवण देवून ( फ्री ) गोड – गोड बोलुन अनेकांना एजन्टांनी लुबाडले ड्रेस दिले तेही मरणाचा,दुकान दोन महिण्यात गायब झिले.आता तर कलकाम व मैत्रीय कंपणीच्या अनेक सदस्यांचे लुबाडले पैसे वापस मिळणार म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिण्या पूर्वी अर्ज देण्यासाठी सभासद एंजन्टाची तोबा गर्दी होती.

          सोमवारी कलेक्टर ऑफीस गडचिरोली मधून पैसे मिळणार आहेत असे एजंट सांगत आहेत.अनेकांनी बचतगटात फसविले,काहीं महिलांनी पतसंस्था काढल्यात, प्रत्येक सदस्या कडून दोन हजार घेवून कोटी रुपये जमा करून अनेक पतसंस्था डुबल्या असे अनेक उदाहरण आहेत.

        तरीही नागरिक मांत्र फसल्यानंतर पोलिसाकडे, सामाजीक कार्य करणाऱ्यांकडे तक्रार घेवून येतात.त्यापेक्षा सहानिशा करूनच अशा कंपनीसी व्यवहार करावे. 

        नाहीतर बँका आहेत. LIC आहेत . ( मी एंजन्ट नाही ) सांगण्याचे तात्पर्य एवढेच की 

सदर कंपण्याचे एजन्टच पो. पाटिल असल्याचे कळते.हे पोलिसांचे मित्र असतात,तेव्हा अशा कंपन्या व एजंटाना पोलिसांनी शोधून काढणे आवश्यक आहे.

     सदर गंभीर बाबीकडे पोलिस निरिक्षकच नव्हे तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सुद्धा लक्ष पुरविण्याची गरज आहे.

       मागील वर्षी एका नामाकीत पक्षाच्या ( बहुजन आघाडीच्या )जिल्हाध्यक्ष यांनी एक लाख भरा दोन महिन्यांत दोन लाख कंपनी देतो म्हणून करोडो रुपये जमा केले. कंपणी पोबारा झाली. 

        एजन्टांना ( गडचिरोली पोलीस नव्हेत )चंद्रपूर पोलीसांनी पकडले व त्यां राजकीय एजंटाला एक वर्ष तुरुंगात राहावे लागले तात्पर्य एवढेच अशा कंपन्या पासुन जनतेनी सावधान राहावे. पैशाची लालच न करता अशा उन्हाच्या तडाख्यात आंबील पेऊन घरी राहणे उतम असे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.