Home Vidarbha चंद्रपूर येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनीत शिवाजी हायस्कूल कूरखेडा येथील माॅडेल ला प्रथम...

चंद्रपूर येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनीत शिवाजी हायस्कूल कूरखेडा येथील माॅडेल ला प्रथम क्रमांकाचा सन्मान…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी

           चंद्रपूर व गडचिरोली या दोन सहभागी जिल्ह्यातून अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत आयोजित विज्ञान प्रदर्शनी मध्ये शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील मॉडेल ला प्रथम क्रमांकाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

            आज दि. 28 फेब्रुवारी शनिवार रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर या ठिकाणी अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत आयोजित विज्ञान प्रदर्शनी मध्ये चंद्रपूर व गडचिरोली या दोन सहभागी जिल्ह्यामधून इलेक्ट्रॉनिक्स विभागाअंतर्गत स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा यांनी सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड स्मार्ट डस्टबिन या मॉडेलला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

           यामध्ये सहभागी विद्यार्थिनी खुशबू सोनवणे आणि हुमदेवी मेश्राम व दर्शन राऊत तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रा. विवेक गलबले, लिकेश कोडापे व शुभम भोयर यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्याम दोनाडकर तसेच प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.