Home Maharashtra जिल्हा परिषद शाळांतील पदोन्नती प्रक्रियेवर TET/CTET संदर्भात स्पष्ट शासन मार्गदर्शक सूचणा द्या...

जिल्हा परिषद शाळांतील पदोन्नती प्रक्रियेवर TET/CTET संदर्भात स्पष्ट शासन मार्गदर्शक सूचणा द्या :- आमदार रामदास मसराम यांची मंत्री भूसे यांच्याकडे मागणी…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी  

          जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शाळांमधील विविध पदांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत TET/CTET पात्रतेसंदर्भात स्पष्ट शासन निर्णय जाहीर करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांची भेट घेत आज मुंबई येथे भेट घेत आमदार रामदास मसराम यानी केली आहे. 

          Supreme Court of India यांनी दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांसाठी TET/CTET परीक्षा पात्रता अनिवार्य करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित शिक्षकांनी दोन वर्षांच्या कालावधीत सदर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले आहेत.

           सदर निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती प्रक्रिया राबविताना उद्भवणाऱ्या प्रशासकीय व कायदेशीर बाबींबाबत राज्य शासनाने शिक्षक शिक्षण परिषद तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविल्याची माहिती आहे. मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

          या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन आमदार रामदासजी मसराम यांनी सविस्तर चर्चा केली. पदोन्नती प्रक्रियेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासन स्तरावरून तातडीने धोरणात्मक निर्णय व सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात, अशी मागणी त्यानी मंत्री महोदयाना केली 

          तसेच, जोपर्यंत शासनाकडून स्पष्ट निर्देश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत संबंधित पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याबाबत आवश्यक आदेश द्यावेत, अशीही विनंती सूद्धा करण्यात आली आहे.

           मार्गदर्शनाच्या अभावी जिल्हा परिषद स्तरावर प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मसराम यानी सांगीतले.याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे सूद्धा उपस्थित होते.