Home Social छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे संविधान साजरा…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे संविधान साजरा…

  युवराज डोंगरे

उपसंपादक/खल्लार..

        छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

        सुरुवातीला उद्देशपत्रिकेचे सामूहीक वाचन करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रविंद्र इचे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.भारत कल्याणकर,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.नितेश गुळसुंदरे उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आशिष काळे यांनी केले,आभार मनिषा लाटेकर हिने मानले.

        कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ.हरीश काळे,प्रा.अतुल चऱ्हाटे,शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.