Home Social चांदागड येथे नाल्यावर बांधला वनराई बंधारा….

चांदागड येथे नाल्यावर बांधला वनराई बंधारा….

      राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी गडचिरोली

       मोजा चांदागड येथे चांदागड नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला असून,”पाणी अडवा पाणी जिरवा,या उद्देशाने पाण्याच्या विहिरीला लागून वनराई बंधारा बाधण्यात आला.

        वनराई बंधाऱ्यामुळे सदर विहिरीतील पाण्याची पातळी वाढली असून चांदागड येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे.यामुळे गावकऱ्यांना आनंद व्यक्त होत आहे.

         बंधारा बांधकाम करताना,विनोद माचलाम,गोमा कवडो,महेश कोडा,वाय.एस. राठोर,विस्तार अधिकारी प.स. कुरखेडा नेताजी प्रधान,विश्वनाथ गावळे,वाय.एस.बनसोड ग्रामसेवक,चांदागड येथील सरपंच हरिरामजी चुरगाये,मोरेश्वर पुराम,ज्ञानेश्वर पुराम,भजनरावजी धूरवे,पुरुषोततम माचलाम,जिल्हा परिषद शाळा चांडागड येथील संच व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.