राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी.
कुरखेडा तालुकातंर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी,समस्या व प्रश्नांची सोडवणूक एकाच ठिकाणी,वेळेत व प्रभावी पद्धतीने व्हावी या उद्देशाने तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कृषी विभाग,महावितरण,महसूल विभाग (तलाठी, मंडळ अधिकारी,सर्व सरपंच ग्रामपंचायत व पंचायत समिती (ग्रामसेवक) पाणीपुरवठा विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,अन्न व नागरी पुरवठा विभाग,पोलीस विभाग,वन विभाग,भूमी अभिलेख विभाग (आखीव पत्रिका संबंधित) इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नागरिकांच्या समस्या तात्काळ नोंदवून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने जनता दरबारात उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक 28 ऑगस्ट 2025
सकाळी : 11:00 वा.
स्थळ : किसान मंगल कार्यालय कुरखेडा..
रामदास मसराम
आमदार, 67-आरमोरी विधानसभा क्षेत्र...



