Home Vidarbha मासळ येथील नाल्या अश्वच्छ,दवाखान्यात शिरले पाणी,ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा :- डॉ.देवनाथ गंधारे…

मासळ येथील नाल्या अश्वच्छ,दवाखान्यात शिरले पाणी,ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा :- डॉ.देवनाथ गंधारे…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

   चिमूर तालुक्यातील मासळ ग्रामपंचायत अंतर्गत नाल्या उपसा होत नसून डॉ.देवनाथ गंधारे यांच्या दवाखान्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या व इतर रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

      ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही नाल्या उपसा करीत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

       नाल्या उपसा न केल्यास ग्रामपंचायत ला कुलूप ठोकण्याचा इशारा माजी जि.प. सदस्य डॉ.देवनाथ गंधारे यांनी दिला आहे.

       मासळ ते तुकूम नंदारा मार्गावर शेवटी डॉ.देवनाथ गंधारे यांचे निवास व दवाखाना आहे. याच मार्गाकडील दूतर्फा नाल्यातून पावसाचे पाणी व गावातील सान्ड पाणी जाते. 

       परंतु नाल्या उपसा झाल्या नसल्याने पावसाचे व सांड पाणी सरळ पास होत नसल्याने दवाखान्यात येते व त्यांच्या अंगणात साचून राहते. 

      त्यामुळे मच्छर,डेंग्यू मच्छर तयार होण्याची शक्यता आहे व या मच्छरापासून आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

      ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष करीत आहे.दोनदा पावसाचे पाणी दवाखान्यात आले.यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन नाल्या उपसा कराव्यात,अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा माजी जि.प. सदस्य डॉ.देवनाथ गंधारे यांनी दिला आहे.