Home Social स्वातंत्र्यलढा म्हणजे काय हे समजले पाहिजे :- एडवोकेट नागदेवते…

स्वातंत्र्यलढा म्हणजे काय हे समजले पाहिजे :- एडवोकेट नागदेवते…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

         भारतीय संविधान 1950 ला स्वतः प्रत अर्पण करण्यात आले संविधानाचे स्वरूप अगदी वेगळे आहे असे प्रतिपादन एडवोकेट ज्ञानेश्वर नागदेवते यांनी केले.

           दिनांक २६-८-२०२५ ला नेरी ग्रामपंचायतच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी सभागृहात विधी साक्षरता तथा कायदे विषयक जन जागरण शिबिर फारच उत्साहात पार पडला.

          याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रेखाताई पिसे होत्या. प्रमुख पाहुणे अँड आर आर सोनडवले ,अँड ज्ञानेश्वर नागदेवते , ग्रामपंचायत सदस्य पिंटु खाटीक,नाना दडमल, ग्राम अधिकारी राजेश कांबळे होते.यावेळी आर आर सोंनडवले यांनी मनोगत व्यक्त केले.

         याप्रसंगी अँड ज्ञानेश्वर नागदेवते म्हणाले की संविधान सर्वोच्च कायदा आहे कायद्यासमोर सगळे सारखे आहे भारतीय संविधान हे आदर्श संविधान आहे यातुन अनेक कायदे निर्माण केले गेले आणि केले जातात लोकशाहीचे दुश्मन हुकुमशाही भेदभाव आहे. 

         न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव हे संवीधानातील मुल्य आहेत.अधीकाराबरोबर नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन केले.

        कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी कोर्टाचे कर्मचारी गावातील महीला पुरुष नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       या कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामपंचायत कर्मचारी किशोर कामडी यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नेरी ग्रामपंचायत ने सहकार्य केले.