Home उपक्रम चारगाव येथे १० कोटी वृक्षारोपण अभियान… — अमृत वृक्ष लागवड तथा...

चारगाव येथे १० कोटी वृक्षारोपण अभियान… — अमृत वृक्ष लागवड तथा एक पेड माँ के नाम’ अमृत वृक्ष लागवडीस उत्स्फूर्त प्रतिसाद… — श्रीलक्ष्मी ए. (मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प), अक्षय गजभिये (उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प), संदीप भारती (सहाय्यक वनसंरक्षक), विष्णू नामदेव सहारे (सरपंच, चारगाव), यांची प्रमुख उपस्थिती…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव) द्वारा नागलवाडी परिक्षेत्रातील चारगाव परिसरात ‘१० कोटी वृक्षारोपण अभियान, अमृत वृक्ष लागवड तथा एक पेड माँ के नाम’ या विशेष उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

       कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीलक्ष्मी ए. (मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प), अक्षय गजभिये (उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प), संदीप भारती (सहाय्यक वनसंरक्षक), विष्णू नामदेव सहारे (सरपंच, चारगाव), ईडीसी अध्यक्ष सुधाकर धुर्वे, राजू बर्वे (मुख्याध्यापक, नवेगाव खैरी), साक्षोधन कडबे (मुख्य संयोजक, आम्ही भारतीय व सचिव, आकाशझेप फाउंडेशन) हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

       या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन,जैवविविधता संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवळ निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. “एक पेड माँ के नाम” या विशेष संकल्पनेतून सहभागी नागरिकांनी आपल्या मातृस्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करून भावनिक बंध आणि पर्यावरणीय जबाबदारी एकत्रितपणे जपली.

      या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ सुरेश बगमारे,भगवान गद्रे ( माजी सरपंच), शेखर राऊत,पोलीस पाटील वंदना ताई भुर्रे, इको क्लब, राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी येथील निसर्गदूत,शिक्षक दिलीप पवार,अमित मेश्राम,महिला बचतगट,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी,इको-डेव्हलपमेंट कमिटी सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच इतर मान्यवर,वनाधिकारी वन कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

       या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे सर्व अधिकारी व कर्मचारी,स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी व विविध स्वयंसेवी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.