Home देशविदेश व्यवस्थेकडून (विशेषतः मुख्य निवडणूक आयोगाकडून) आमच्या (भारतीय जनतेच्या) मताधिकाराची चोरी म्हणजे लोकशाही...

व्यवस्थेकडून (विशेषतः मुख्य निवडणूक आयोगाकडून) आमच्या (भारतीय जनतेच्या) मताधिकाराची चोरी म्हणजे लोकशाही आणि संविधानाची गळचेपी. म्हणूनच “आम्ही भारताचे लोक” या शीर्षकाखालीच मुख्य निवडणूक आयोगाविरुद्ध,”महामोर्चाचे”आयोजन…

        आदरणीय सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्याच नव्हे तर आमच्या (भारतीय जनतेच्या) मूलभूत हक्कात सर्वोच्च स्थानी असलेल्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे “आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा अधिकार म्हणजे प्रत्येक निवडणुकीतील मताचा अधिकार.”

     असे ते का म्हटले असतील?याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जेंव्हा 1998/99 मध्ये मा. माजी प्रधानमंत्री अट्टल बिहारी वाजपेयी यांना लोकसभेत एकाच मताची आवश्यकता होती.ते त्यांना मिळू शकले नाही. आणि 13 दिवसात सरकार कोसळले…

         म्हणजे एक मत काय करू शकते याचे गांभीर्य तेंव्हा भाजपला समजले.

        म्हणूनच की काय RSS ने / भाजपाने संपूर्ण मतांचा अधिकारच सर्वोच्च न्यायालय,निवडणूक आयोग, राष्ट्रपती यांना येनकेन प्रकारे हाताशी धरून EVM बनविणाऱ्या दोन्ही भारतीय कंपन्यात आपले प्रतिनिधी बहुमताने संचालक नियुक्त करून त्याप्रमाणे EVM सेटिंग करून घेण्याचा प्रयत्न केला. ही तयारी त्यांनी 2019 ते 24 च्या दरम्यान पूर्णत्वास नेल्यामुळेच की काय अब की बार 400 पारचा नारा दिला होता.

        RSS आणि भाजपाच्या या षडयंत्राला आज 2025 च्या ऑगस्टमध्ये दुजोरा मिळतो आहे,तो म्हणजे शरद पवार यांनी माझ्याकडे ती दोन माणसे ( EVM हॅकर्स ) येऊन आम्हाला 150 ते 160 जागा मिळवून देऊ शकतो असे आश्वासित केल्याचा गौप्यस्फ़ोट केला. लागलीच संजय राऊत यांनी ती दोन माणसे उद्धव साहेबांना सुद्धा भेटली. असाही गौप्यस्फ़ोट केला!

        मग हीच दोन माणसे मग भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे अर्थात महायुतीकडे गेली का?त्यांनीच महाराष्ट्रात महायुतीला पाशवी बहुमताने सत्तेत बसवले का?असा प्रश्न आम्हाला आता पडतो…..

       एवढी मोठी सत्ताधाऱ्यांची नांगी धरण्याची संधी हातात आलेली असताना शरद पवार गट आणि उ.बा.ठा. शिवसेना गट यांनी त्या दोन माणसांना शोधून पटलावर आणण्याचे काम का केले नाही?

        हे काम केले असते,तर निश्चितच सर्व सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र उघड झाले असते. या षडयंत्रात कोण कोण सहभागी आहेत? निवडणूक आयोग यात सहभागी आहे का? या सर्व प्रकरणाचा छडा लागलाच असता!

       परंतू ,यांनी तसे काहीही केले नाही याचा अर्थ कुठेतरी पाणि मुरत आहे…

          आज ज्या पद्धतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सायंकाळी सहानंतर झालेल्या 76 लाख मतदानाचा डेटा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन याचिकेद्वारे मागितला( ही याचिका खारीज केली तो भाग सोडून द्या ). परंतू , सर्वोच्च न्यायालयानी ती मान्य केली नाही. यावरून ” जनतेच्या न्यायालयात ” आज सर्वोच्च न्यायालय सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहे….

      त्याचप्रमाणे लोकसभा विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी कर्नाटकातील महादेवपुरा या मतदार संघातील एक लाखाच्या वर मतदारांचे झालेले बोगस मतदान पुराव्यानीशी शोधून काढले.यावरून रागाने चिडून येऊन निवडणूक आयुक्ताने 7 दिवसात शपथपत्र सादर करावयास सांगितले किंवा देशाची माफी मागायला सांगितले.

        जर ती दोन माणसे कोण होती, हे जर यांनी उघडकीस आणले असते.लोकसभा विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी,श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाला त्या दोन माणसामुळे फळ आले असते.मग या EVM केंद्र आणि राज्य सरकारचं काय करायचं ते मग जनता आणि हे सर्व विरोधी पक्षांनी बघुन घेतलं असतं!

           परंतू,या सर्वामध्ये एकंदरीत विचार जर केला तर विरोधी पक्ष जरी बेचैन असला तरी मजेत आहे.परंतू आम्ही भारतीय जनता मात्र 2029 पर्यंत केवळ मुख्य निवडणूक आयोगाच्या संविधान अनिष्ठतेमुळे आमच्या मताधिकाराच्या अपहरणामुळे आमच्यावर जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था निर्माण झाल्यामुळेच आम्ही हतबल झालोत.परिणामी जेवढ्याकाही समस्या आमच्यासमोर आ वासून उभ्या राहिल्यात आणि राहतील. त्यांचे बीज या मताधिकाराच्या अपहरणात आहे…..!

         म्हणूनच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच भारतीय जनतेच्या आणि सर्वच संविधानवादी विरोधी राजकीय पक्षांच्या तसेच सर्वच सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात, विभागीय आयुक्त कार्यालयावर मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थानी असलेल्या मताधिकाराचे संरक्षण करण्यासाठी EVM कायमचे हटविण्यासाठी आणि SIR च्या नावाखाली बोगस मतदार निर्माण करून विशिष्ट राजकीय पक्षाला सत्तेवर पुन्हा पुन्हा बसविन्याच्या षडयंत्रा विरोधात…

      महामोर्चाचे आयोजन लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. आपणही आपल्या शहरांत करावे….

         आवाहनकर्ते…

सर्व संविधाननिष्ठ छत्रपती संभाजीनगरवासी…