बरांज खुली कोळसा खान उत्पादनात प्रथम…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती –  

       बरांज या खुल्या कोळसा खाणीचे नागपूर येथे वार्षिक खान सुरक्षा निरीक्षण करण्यात आले त्यात बरांज खुल्या कोळसा खाणीला सुरक्षा ठेवून कोळशाचे उत्पादन केल्याबद्दल प्रथम क्रमांक देण्यात आला.

          खान सुरक्षा महानिर्देशालय द्वारा आयोजित २०२३ पुरस्कार वितरण कार्यक्रम नागपूर येथे घेण्यात आला. यामध्ये विविध कोळसा खाणीचे निरीक्षण करण्यात आले. बरांज खुल्या कोळसाखानीने वर्षभरात आपल्या कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन ब्लास्टिंग करणे व उत्पादनात वाढ करणे यासाठी 2023 चा प्रथम पुरस्कार बरांज खुल्या कोळसा खाणीला देण्यात आला.

            तर कंपनीच्या चांगल्या कार्या बद्दल व्दितीय पूरस्कार सुध्दा देण्यात आला. हा प्रथम पुरस्कार डी एम एस रवींद्र, वेकोली सीएमडी मनोज कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. बरांज खुल्या खाणीला प्रथम स्थानी नेण्यामागे अभियंता उदय नाईक, खान प्रबंधक ए नागेंद्र, श्रीनिवासराव ,ए सॉबय, सुरक्षा अधिकारी सत्यनारायणराव, अब्दुल खादेर, राजेश वासाडे यांचे सहकार्य लाभले.