अज्ञात इसमाने हॉटेल व्यावसायिकाचे जाळले घर… — मध्यरात्रीच्या दरम्यानची खल्लार फाट्यावरील गंभीर घटना.. — नागरिकांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली,रोख रक्कम, सोन्याचे दागिने,घरगुती सामानाची झाली राखरांगोळी…

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक 

        अज्ञात समाजकंटकाने खल्लार फाट्यावरील हॉटेल व्यावसायिकाचे राहते घर पेट्रोल टाकून जाळले असल्याची गंभीर घटना मध्यरात्रीचे दरम्यान घडली.

              घर जाळपोळ घटनातंर्गत रोख रक्कम,सोन्या चांदीचे दागिने,मोबाइल व घरातील सर्वच सामानाची राखरांगोळी झाली असून नागरिकांना सतर्कतेने जीवितहानी टळली.

            खल्लार फाट्यावर पंडीत प्रल्हाद वानखडे यांचे माऊली स्विट कॉर्नर हॉटेल आहे.खाली हॉटेल असून वर पंडीत वानखडे हे आपली पत्नी व मुलगा सुमित सोबत राहतात.

             नेहमी प्रमाणे काल २६ ऑगस्टला पंडीत वानखडे यांनी आपले हॉटेल बंद केले व जेवन करुन झोपले असता मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास कुणी तरी अज्ञात समाज कंटकाने ते वर राहत असलेल्या मजल्यावरील घरात पेट्रोल टाकून पेटवून दिले. 

         पाहता पाहता आगीने रोद्र रूप धारण केले व घरातील सर्वच सामानाची राखरांगोळी केली.यात एक लाख रुपये रोख,तीन मोबाइल,घरातील सोन्या चांदीचे दागिने,एल.इ.डी,सोफासेट, फ्रिज, व घरातील सर्वच सामानाची राखरांगोळी झाली.

             मात्र नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मुलगा सुमित जखमी झाला असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

            मात्र,अग्नीकांडात वानखडे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अज्ञात समाजकंटकामुळे क्षणात घरातील सामानाची राखरांगोळी झाली.

      जनतेच्या सतर्कने पुढील अनर्थ टळला

       खल्लार फाट्यावरील पंडीत वानखडे हे हॉटेल व्यावसायिक असल्याने खल्लार परिसरात सर्वांच्या परिचयाचे आहेत.त्यांच्या घराला रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली हि बाब खल्लार फाट्यावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्या व्यक्तीने गजानन धुमाळे,अमेय मोपारी,ऋषिकेश मोपारी,बंटी वानखडे, ऋषी बहिरे, अक्षय दहाट,अमोल वानखडे, ऋषी इंगळे, आकाश उमाळे, आदिल शहा, अजिंक्य डिके यांना फोन करुन बोलाविले असल्याने ते लगेच सर्वजण खल्लार फाट्यावर पोहचले व आग विझवण्यास मदत करुन सतर्कता दाखविली.यामुळे जिवितहानीचा होणारा पुढील अनर्थ टळला.

      ठाणेदाराची तत्परता

        खल्लारच्या कर्तव्यदक्ष ठाणेदार चंद्रकला मेसरे यांना माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलिस कर्मचारी शरद डहाके,संतोष चव्हान यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले.

    खल्लार पोलिसात तक्रार

          खल्लार फाट्यावरील पंडीत वानखडे यांच्या राहत्या घराला कुणीतरी अज्ञात समाजकंटकाने आग हि मुद्दाम लावली असल्याचे पुरावे आढळून आले.त्यावरुन पंडीत वानखडे यांनी याबाबतची तक्रार खल्लार ठाण्यात दाखल केली असून खल्लार ठाण्यात अज्ञात समाजकंटकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.