शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
बालपणापासूनच चित्रकलेची आवड असणारी नांदेड जिल्ह्यातील किनवटची साक्षी वाडगूरे हिने आज पावतो आपल्या कलेतून अनेक लक्षवेधक व उत्तम चित्रे रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली आहे.

साक्षी ही किनवटच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात कला शिक्षिका असून तिचे शिक्षण B.S.C.B.A.ATD पर्यंत झाले आहे.तिचे वडिल देखील काॅस्मोपोलिटन विद्यालयात एक शिक्षक आहेत.कुटूंबांतील आई वडीलांचे प्रोत्साहन आपणांस वेळोवेळी मिळाल्याने आपण या कलाक्षेत्रात अल्पकालावधीत प्रगती केली असल्याचे साक्षी वाडगूरे हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
साक्षी हिला या अप्रतिम कलेसाठी अनेक सामाजिक संस्थेकडून पुरस्कार बहाल झाले आहेत.

मध्यंतरी तिने किनवट नगरीत रांगोळीचे एक प्रदर्शन भरविले होते.त्या प्रदर्शनाला कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी भेटी देत तिच्या कलेचे कौतुक केले होते.
किनवटची साक्षी ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप कलाकुंज गृपची सहसंयोजिका असून याच गृपची मुख्य संयोजिका चंद्रपूरची वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे ही आहे.

आगामी काळात किनवट शहरात भव्य रांगोळी प्रदर्शन भरविण्याचा साक्षी वाडगूरेचा मानस आहे.
रांगोळी आर्टिस्ट साक्षीचे अभिनंदन!
रांगोळीच्या माध्यमातून विविध लक्षवेधक चित्रे रेखाटणा-या वाडगूरे हिचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे,नंदा कामडी, चैताली आतराम, कविता जुमडे, रंज्जू मोडक, नलिनी आडपवार, अंजली इटनकर, अधिवक्ता सारिका टेंभरे यांनी अभिनंदन करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




