बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववाचे धगधगते विचार घेऊन पुढे जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,आमचे नेते मार्गदर्शक सचिव श्री.संजयजी मोरे,जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते व सौ.सिमा प्रशांत कल्याणकर शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर शहर प्रमुख अँड श्री.आनंद केकाण यांच्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन त्यांची शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
त्याबरोबर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाबूद्दीन सय्यद यांची उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना (शिंदे गट) मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे दोन्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.



