Home Maharashtra चिमूर तालुक्यातील माकोना ते गिरोला रस्त्याचे बांधकाम झाले सुरू… — शेतकऱ्यांच्या...

चिमूर तालुक्यातील माकोना ते गिरोला रस्त्याचे बांधकाम झाले सुरू… — शेतकऱ्यांच्या आंदोलनासह,” दखल न्यूज भारत वेब पोर्टलच्या,बातमीचा भारदस्त परिणाम…‌.

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

       मागिल आठवड्यात चिमूर तालुक्यातील मौजा माकोना ते गिरोला रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे यासाठी वरोरा तालुका अध्यक्ष तथा भिम आर्मीचे चिमूर तालुका प्रभारी जगदीश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावरच अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते.

        या आंदोलनाची वेळीच दखल घेत,दखल न्यूज भारत वेब पोर्टल मध्ये,विशेष प्रतिनिधी शुभम गजभिये यांच्या वृत्त संकलनानुसार शेतकऱ्यांच्या बांधावरील आंदोलनाची बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

      सदर बातमीचा एवढा भारदस्त परिणाम पडला की संबंधित सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता नागभिड,उपविभागीय अभियंता चिमूर व कंत्राटदार गुप्ता यांनी वेळीच बातमीसह आंदोलनाची दखल घेतली आणि कंत्राटदार गुप्ता आपल्या सहकाऱ्यांसोबत आंदोलन स्थळी गेले.

         भिम आर्मीचे चिमूर तालुका प्रभारी जगदीश मेश्राम आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांत रस्ता बांधकामाला सुरुवात करतो असे सांगितले.

         कंत्राटदार गुप्ता यांनी बांधावरील आंदोलकांना दिलेल्या शब्दाला महत्व देत रस्ता बांधकामाला सुरुवात केली.

     यामुळे बोललेल्या शब्दाला कंत्राटदार जागल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.