यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण :- अनिल किरणापुरे..

संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

दखल न्युज भारत 

 वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अवचित्ये.

         मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या शिक्षणावर अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो.शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी महत्त्वाची असते.देशाला राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात‌. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगी विकास करण्यासाठी शालेय उपक्रम स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा ,शैक्षणिक स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, डिजिटल शिक्षण,उच्च दर्जेदार शिक्षणाची आता देशाला अत्यंत गरज आहे असे ते बोलत होते.

            उच्च प्राथमिक शाळा परसोडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.स.सदस्य युवा शेतकरी अनिल किरणापुरे उद्घाटक जि.प.सदस्य शितल राऊत, सरपंच जयश्री ताई पर्वते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पूनम पातोडे ,विरेंद्र रामटेके, प्रशांत कापगते अविनाश बनकर, तुलसीदास पटले, संदीप भांडारकर ,नरेंद्र भांडारकर, फागेश्वर कुसराम, सुमन इरले, संगीता वडीकार,ओमिता झोडे ,वंदना कांबळे, प्रतिमा कांबळे, कल्पना उके, रंजीत लेदारे, दिलीप पर्वते,शामराव कांबळे, भोजराज वघारे, गजानन बनकर ,उत्तम कडुकार, चोपवंता पातोडे,सरिता घरत,मनीषा वघारे, कांता मेश्राम, कौतिक रामटेके, एस.सी मांदाडे ,एस .जी. भगत, बी.डी. गौतम, आर .एल.बिसेन,सीमा भाजीपाले, अक्षय मेश्राम, देवराम मासुलकर, हेमराज कडुकर, हिरामण कांबळे ,भूमिता पातोडे, मारोती भाजीपाले, व समस्त शिक्षक वृंद माता पालक संघ स्वयंपाक की मदतनीस विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकरी मंडळी उपस्थित होते सूत्रसंचालन डी.पी.उईके सर प्रास्ताविक बी.के.मुंगमोडे सर आभार एस.जी.भगत सर यांनी केले.