Home उपक्रम रासेयो शिबिर माणसे घडविण्याची प्रयोगशाळा :- प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले…

रासेयो शिबिर माणसे घडविण्याची प्रयोगशाळा :- प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे निवासी शिबिर गट ग्रामपंचायत शिरपूर येथे दिनांक२४ डिसें ते ३० डिसें २०२५ या कालावधीत आयोजीत करण्यात आले आहे. Digital literacy and my youa Bharat अंतर्गत लोकसहभागातून स्वयंपूर्ण ग्रामविकास या संकल्पनेवर आधारित आहे. दिनांक 25 डिसेंबर ला श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

              याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्ले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, रासेयो स्वयंसेवकांनी चिरकालीन कामे केली पाहिजे. त्यांनी गावातील माणसे जोडली पाहिजे. संघर्षाशिवाय विकास साध्य नाही. कठीण संघर्षातून मानवी क्षमता विकसित होतात. या प्रसंगी प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्लेनी समकालीन झाडीपट्टी रंगभूमी हे चरित्रग्रंथ भेट दिले.

            या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गांधी सेवा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष प्रा.महादेवराव पिसे होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकानी श्रमाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे. रासयो स्वयंसेवकांची कोणती जबाबदारी व कर्तव्ये आहेत ते विशद केले.

         या उद्घाटन प्रसंगी गट ग्रामपंचायत शिरपूर चे सरपंच, जयपाल गावतुरे उपसरपंच राजेंद्र भानारकर, सौ. वर्षा डहारे, सौ. वैशाली निकोडे, सौ.लता काळसर्पे, सौ. प्रतिभा गावातुरे श्रीमती सुनिता कुमरे दिवाकर डहारे, मंगेश भानारकर, जीवन बोरकर, ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामविकास अधिकारी लोकचंद भसारकार व अर्चना मोहुर्ले उपस्थित होते.

         कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड डॉ.श्याम खंडारे,रासेयो संचालक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा प्रा गुरुदास बल्की रासेयो चंद्रपूर जिल्हा समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रासेयो निवासी शिबिरांची भुमिका प्रभारी डॉ.पितांबर पिसे तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.गजानन चव्हाण, आभार डॉ.राजेश्वर राहांगडाले यांनी केले.

           या उदघाटन प्रसंगी शिरपूर ग्रामस्थ, रा तु महाविदयालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात एकुन १०० रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.निलीमा तुरानकर, प्रा.गुणवंत वाघमारे यांनी परिश्रम घेतले.