Home Maharashtra नैतिकता जोपासणारे आणि व्यवस्था बदलवणारे अधिकारी बना… — मॅजिक डे निमित्त...

नैतिकता जोपासणारे आणि व्यवस्था बदलवणारे अधिकारी बना… — मॅजिक डे निमित्त आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांचा सूर…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

दिनांक 25 डिसेंबर, भिसी : ब्राईट एज फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या मॅजिक उपक्रमाचा स्थापना दिवस दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी रमेशकुमार गजबे शिक्षा संकुल, पुयारदंड येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या विकासासोबतच नैतिकता जोपासून समाज परिवर्तनाचे कार्य करावे असे मत व्यक्त केले.

        गेल्या सहा वर्षापासून आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अध्ययनाची संधी उपलब्ध व्हावी याकरिता ब्राईटेज फाउंडेशन च्या माध्यमातून मॅजिक अर्थातच मातोश्री अकॅडमी गायडन्स इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटर हा उपक्रम गेल्या सहा वर्षापासून भिसी परिसरात सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन अभ्यासिका निवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. या या उपक्रमाच्या सातव्या स्थापना दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणारे बोधि रामटेके यांनी कायद्याचे शिक्षण व मूल्य व्यवस्था यावर विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजामध्ये समानता व शांततेच्या दृष्टिकोनातून 25 डिसेंबर चे महत्व त्यांनी अधोरेखित केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी फक्त स्पर्धा परीक्षेचा विचार न करता स्वतःचे आयुष्य स्थिर करण्यासाठी प्लॅन बी ची सुद्धा नियोजन करावे असे त्यांनी सुचित केले. यामुळे आपण आर्थिक व सामाजिक रीतीने स्थिर होऊन सोबतच आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वापरू यामुळे बहुजनांच्या जीवनात परिवर्तन होईल. असा आशावाद त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

         तसेच प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणाऱ्या तृतीयपंथी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे यांनी आपल्या स्वतःच्या प्रवासाविषयी व संघर्षाविषयी मनोगत व्यक्त केले. समाज जसे मुलाला वंशाचा दिवा म्हणतात तर मुलीला दिव्याची पणती परंतु तृतीयपंथीयांची ओळख काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दिव्याला व पणतीला विजू न देणारी काचेची पायली म्हणजे तृतीयपंथी असे व्याख्या त्यांनी यावेळी केली. साहित्य क्षेत्रातील शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. संजय बोधे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच स्वतःची चार चाकी वाहक मॅजिक ला मदत म्हणून सुपूर्द केले. यांचा सुद्धा सेवानिवृत्ती निमित्ताने मॅजिक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

        नागपूर येथील वर्षाताई रंदई यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची हितगुज साधले. डॉ.रमेशकुमार गजबे यांनी अध्यक्ष भाषणात मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशोदा जांभूळे, सूत्रसंचालन मॅजिक विद्यार्थिनी प्रियंका पुराम तर आभार डिंपल चौधरी यांनी मानले. याप्रसंगी तब्बल 11 जिल्ह्यातून मॅजिक प्रवेश परीक्षेसाठी आलेले 160 विद्यार्थी व इतर श्रोते वर्ग उपस्थित होते.