बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा- नरसिंहपुर (ता. इंदापूर) येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सर्व अधिकाऱ्यांचे नरसिंहपूर, गिरवी, टणु लुमेवाडी, पिंपरी बुद्रुक, ओझरे,गोंदी,सराटी,सह आधी सर्व गावांच्या ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या वतीने प्रथम स्वागत करण्यात आले.
राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून हे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाले आहे. नव्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी डीवायएसपी सुदर्शन राठोड तसेच निरा – नरसिंहपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून गजानन चेके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.
यावेळी सहाय्यक फौजदार प्रकाश माने, सहाय्यक फौजदार भरत जाधव, पोलीस हवालदार जगन्नाथ कळसाईत, किरण चंदनशिवे, महेश गोसावी, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा जगताप, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सलगर, अरीफ सय्यद, शनिदेव कांबळे, समाधान अहिवळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा देवस्थानचा महाप्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच नरसिंहपुर गावच्याही वतीने सरपंच विठ्ठल देशमुख,सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, माजी सरपंच आण्णा साहेब काळे, माजी सरपंच विलास ताटे, सरपंच नरहरी काळे, सरपंच जगदीश सुतार,तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, सरपंच संतोष मोरे, आनंद काकडे, चंद्रकांत सरवदे, विजय सरवदे, दत्तात्रय कोळी, समाधान सरवदे, सचिन कदम,पोलीस पाटील अभयकुमार वांकर, पोलीस पाटील वर्धमान बोडके, पोलीस पाटील मुजावर सय्यद, दिलीप रास्ते, किरण खंडागळे, देवस्थान व्यवस्थापक गौरव देशपांडे, उपस्थितीत ग्रामस्थ व पत्रकार बांधवांच्या हस्ते देखील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके यांचा सन्मान करण्यात आला.
नवीन पोलीस स्टेशन सुरू झाल्यामुळे निरा -नरसिंहपूर या परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन अधिक तत्परपणे कार्य करेल असा विश्वास गजानन चेके यांनी व्यक्त केला.
चौकट..
निरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.या परिसरातील कायदा -सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे तसेच सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.
नागरिकांच्या तक्रारी तत्काळ व पारदर्शकपणे सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर राहील. जनतेच्या सहकार्याने शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा मानस आहे. अशी प्रतिक्रिया प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके यांनी पदभार स्वीकारताना दिली.



