Home Maharashtra चिमूर तालुक्यात विना परवानगीने झाल्याय विटा भट्ट्या सुरु…. — विटाभटृटी धारकाकडून...

चिमूर तालुक्यात विना परवानगीने झाल्याय विटा भट्ट्या सुरु…. — विटाभटृटी धारकाकडून प्रदूषणासह इतर नियमांचे पालन अजिबात केले जात नाही!… — दंडात्मक आणि इतर कारवाई का म्हणून नाही?

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक…

      चिमूर तालुक्यात शेकडो विटाभट्या विनापरवानगी सुरु झाल्या असून शासनाचा महसूल बुडाला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.याचबरोबर विटा भट्टी सुरु करण्यापूर्वी पर्यावरण विभागासह इतर विभागाची परवानगी घेतली जात नसल्याचे पुढे आले आहे.

          विटभट्टी म्हणजे मातीपासून विटा बनवून भाजण्याची जागा (भट्टी) होय,जिथे माती, रेती,पाणी मिसळून विटा तयार करतात आणि भट्टीत उच्च तापमानावर भाजून बांधकामासाठी तयार करतात,ज्यामध्ये वीटभट्टी कामगारांचे जीवन आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

              विटा प्रामुख्याने चिकणमाती,रेती आणि पाणी वापरतात,माती मळून,साच्यात भरून,उन्हात वाळवून मग भट्टीत भाजतात.

वीटभट्टी व्यवसाय आणि संबंधित बाबी परवानग्या….

      वीटभट्टी सुरू करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या आणि इतर शासकीय प्राधिकरणांच्या परवानग्या घेणे आवश्यक असते.भट्ट्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होते,म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

          तद्वतच वीटभट्टीवर काम करणारे कामगार,विशेषतः त्यांची मुले,शिक्षणापासून वंचित राहतात,किंवा त्यांच्या मुलाकडे दुर्लक्ष केले जाते.हा सामाजिक अप्रगतिचा भाग ठरतो आहे.

          वीटभट्टी हा बांधकाम उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग आहे,जो कच्च्या मालापासून बांधकाम साहित्य तयार करतो.यामध्ये व्यावसायिक बाजू,पर्यावरणीय जबाबदारी आणि कामगारांच्या सामाजिक समस्यांचा समावेश असतो,ज्यासाठी योग्य नियोजन आणि सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे..

         मात्र मातीच्या विटाभट्या सुरू करताना पर्यावरण विभागाच्या व इतर संबंधित विभागाच्या परवानग्या घेतल्या जात नसतील सदर विट्टाभट्टी धारकावर आवश्यक दंडात्मक कारवाई का म्हणून करण्यात येत नाही आणि त्यांच्या विटाभट्या बंद का म्हणून केल्या जात नाही?हा प्रश्न भ्रष्ट यंत्रणेचा गाभा आहे.