धानोरा येथे बिरसा मुंडा, गोटुल भूमी येथे पेसा आणि वन हक्क दिन केला साजरा.

भविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

          तालुका ग्रामसभा महासंघ यांचे तर्फे येथील बिरसा मुंडा गोटुल भूमी येथे पेसा आणि वन हक्क दिन 24 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सल्ला गागरा शक्तीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामण वरखडे कार्यक्रमाचे उद्घाटन दौलत शहाबापू मडावी, प्रमुख अतिथी देवाजी तोफा,सावंताराम लालाजी, एडवोकेट राहुल गावडे, बाजीराव नरोटे, अमित नरोटे, नायब तहसीलदार संजय वलके, बाजीराव वलको,  दुरु उसेंडी इत्यादी उपस्थित होते.

    मावा नाटे मावा राज दिल्ली मुंबईत मावा सरकार अशा घोषणा देण्यात आल्या.  कार्यक्रमात अनेक विषयावर ठराव पारित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा भूरकुरिया संचालन संजय पदा तर आभार प्रदर्शन गणेश हलामी यांनी केले.या कार्यक्रमाला तालुक्यातून बहुसंख्य आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते.