संतांचे कार्य नेहमी समाजाकरीता मार्गदर्शक ठरले आहे :- माजी मंत्री बाळासाहेब थोरात… — आळंदीत महादेव मंदिराचा भुमिपूजन सोहळा थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे विचारांचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर पडला आहे, संतांनी नेहमी समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली आहे आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे हे समजावले अशा प्रकारे संतांनी समाजाची गरज जाणुन कार्य केले हे नेहमी समाजाकरीता मार्गदर्शक ठरले आहे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

        नगर जिल्ह्यातील ज्ञानदेव तुकाराम भक्त संप्रदायाच्या धर्मशाळेत कै.सिंधुबाई निवृत्ती आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने महादेव मंदिराचा भुमिपूजन सोहळा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, डॉ.किरण लहामटे, माजी आमदार विलासराव लांडे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, डि.डि.भोसले, उमेश रानवडे उपस्थित होते.

         आळंदी दौऱ्यावर आलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काॅंग्रसचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.मनोज राका, नंदकुमार वडगावकर, उमेश रानवडे, ज्ञानेश्वर वीर, उमेश महाराज बागडे उपस्थित होते.