अबोदनगो चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा :- मेळघाट “सामान्य माणसाचा पक्ष, हक्कांसाठी लढणारा पक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष” या घोषणांनी आजचा प्रवेश सोहळा दणाणून गेला.महाराष्ट्राचे लढवय्ये नेतृत्व, शेतकरी नेते श्री बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री संस्थापक अध्यक्ष प्रहार संघटना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो युवक-युवती, समाजातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात प्रहार जनशक्ती पक्षात दाखल झाले.
यामध्ये चिखलदरा तालुक्यातील नामांकित व्यक्ती,युवक वर्ग, व महिला वर्ग यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये नगराध्यक्ष चिखलदरा सतीश गौर, श्रीमती.नगराध्यक्षा गीताबाई जामकर, श्री.नगरसेवक अनवर भाई हुसैन, श्री.नगरसेवक राजुभाऊ भालेराव,सौ. नागसेविका कल्पनाताई खाडे, श्री.पं.समिती उपसभापती मुन्नाभाई बैठेकर, श्री. शैलेंद्र गावंडे सरपंच टेंभ्रुसोंडा त्यासोबतच विद्रोही संस्था अध्यक्ष शुभम कच्छवा, उपाध्यक्ष धर्मपाल गायकवाड, फारुक अली उपाध्यक्ष व्यापारी संघटना देवीपॉइंट, रामकिशन कास्देकर विद्रोही संघटना,श्री.सचिन गोराले.इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महिला आघाडीच्या सौ.दीपमाला चौहान, सौ.सोनम घोरे,सौ.मोहिनी महत्तमची,पूजा तिवारी,सौ.वैष्णवी सिंधन,सौ,सारिका चौधरी,सौ.सुवर्णा चिखलकर,शबनम परवीन मतीन खान,सौ.कुसूम गाडे,सौ.सविता शेकोकर,सौ.वर्षा काटोले, आसियान सिराजदीन शेख,सौ.दीपा श्रीवास,सौ माया पतिंगे, सौ.माला जगदेव,सौ.सुषमा पळसपागर,सौ. गीताबाई सावलकर,सौ.सुमन कासदेकर,सौ.पूनम लादे. सौ. माला लादे.सौ.प्रगती धुर्वे,सौ.जयमाला पाटोरकर,सौ.सुषमा बोरदे,सौ.प्रीती नाईक,शाहिस्ता बी मोहम्मद आसिफ,सायरा बी मोहम्मद आसिफ, सौ.सुवर्णा पटेल व सौ. उज्वला पानझडे इत्यादी महिलांचा समावेश होता.
त्यासोबतच युवक व युवतींनी ही प्रवेश घेतल्या त्यामध्ये चि.सागर चव्हाण,सागर लादे,गौरव सोमवंशी,शुभम मिश्रा,प्रतीक रामधानराव,भूपेंद्र महत्तम,अंशू तायडे, रुद्रा चव्हाण, आयान हुसैन,पवन मडवी,अभिषेक इंगोले,आयुष ठाकूर,कपिल वानखेडे,रोहित मनोहरे,आकाश मनोहरे,सागर मनोहरे,उदय चव्हाण,संकेत पारधी,ऋ ऋषिकेश धोंगरे,अमर दाभाडे,अंकुश डोंगरे,शेख सोहेल,रणवीर चव्हाण, शाहरुख मोहम्मद,शेख जाकीर,अमोल वानखेडे,प्रवीण जाधव,सचिन गोडवे,प्रशांत बेलसरे, इत्यादि युवकांचा समावेश होता.
त्यासोबतच हातारु जी.प सर्कलचे श्री.मुन्ना बैठेकर, श्री.कालू बैठेकर,श्री. बाजीलाल ठाकरे,श्री.विनोद बचले, श्री.मुंगीलाल मोरे,तसेच टेंभ्रुसोंडा जी. प.सर्कलचे श्री. राकेश साकोम,श्री.रामदास जामुणकर,श्री.सागर बेलसरे,श्री.गणेश तोटे,श्री.गोमा उमरकर,श्री संजू तोटे तसेच सलोन जी. प.सर्कलचे श्री. किसन आखांडे,श्री अविनाश बेलसरे,श्री.किशन कास्डेकर, चिखली जी. प. सर्कलचे श्री.नंदभाऊ बेलसरे,श्री.विश्राम दांडे,श्री. पथीराम कासडेकर, श्री.सज्जु बेलसरे,श्री.सुनील दांडे,श्री.सोनाकलाल कास्डेकर,श्री.सहदेव निकाळे,श्री.भोला परते,श्री.गणेश बावणे इत्यादी मान्यवरांचा श्री. बच्चू भाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रहार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश झाला.
प्रवेश कार्यक्रमात कार्यकर्त्यांचे लाल फेटे, घोषणांचा जयघोष आणि प्रहारची ओळख असलेला जाज्वल्य उत्साह पाहायला मिळाला. नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी “आमच्या हक्कांसाठी लढायचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा तर फक्त प्रहारच हाच खरा पर्याय आहे” असा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्रहार म्हणजे जनतेचा आवाज, प्रहार म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड! नवीन रक्ताच्या सहभागामुळे पक्षाची ताकद अनेकपटीने वाढणार आहे.”
नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणखी भक्कम होईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



