Home Social कारगिल विजय दिनानिमित्त गडचिरोलीत वीर शहीदांना अभिवादन… — माजी खा.डॉ. अशोक...

कारगिल विजय दिनानिमित्त गडचिरोलीत वीर शहीदांना अभिवादन… — माजी खा.डॉ. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत कारगिल चौकात वीर अमर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

   शुभम गजभिये 

    विशेष प्रतिनिधी…

गडचिरोली :- दि. २६ जुलै २०२५

      “शूर वीर मरतात पण त्यांच्या शौर्याची गाथा अमर राहते…” या उदात्त भावनेने प्रेरित होऊन गडचिरोली शहरातील आठवडी बाजारालगत असलेल्या कारगिल चौकात आज कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून वीर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

        या कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत अमर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात,ज्यांनी वीर जवानांना मानवंदना अर्पण करून शौर्य आणि बलिदानाचा गौरव केला.

वीर जवानांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता मा.खा.डॉ.अशोकजी नेते…

           या विर जवानांनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत भावनिक श्रद्धांजली कार्यक्रमात मा.खा.डॉ.अशोकजी नेते म्हणाले, “देशाच्या सीमांवर आमचे वीर जवान जागृतीने उभे आहेत, म्हणूनच आपण आज सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानामुळे भारताचे मानाचे तिरंगं अभिमानाने फडकते.”

           ते पुढे म्हणाले की, १९९९ मध्ये स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तानी खुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत विजय संपादन केला. याच विजयाची आठवण म्हणून दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा केला जातो. वीर जवानांच्या बलिदानाचा आपण सन्मान करावा कारगिल विजय हा केवळ एक लष्करी विजय नव्हे तर तो राष्ट्राभिमान, एकता आणि भारतीय शौर्याचा जयघोष असल्याचे ते म्हणाले.

         भर पावसातही नागरिकांनी छत्री घेऊन देशभक्ती जागृत केली.आजचा दिवस हवामान विभागाने पावसाळी अलर्टसह सुरु झाला होता, मात्र, भारत मातेच्या प्रेमासाठी नागरिकांनी छत्र्या हातात घेत, वीर शहीदांच्या स्मृतीप्रती ,कृतज्ञता व नतमस्तक होण्यासाठी कारगिल चौक गाठले. शालेय विद्यार्थी, एनसीसीचे कॅडेट्स, माजी सैनिक आणि सामान्य नागरिकांचे मोठे एकत्रीकरण यावेळी पहायला मिळाले हे विशेष.

वीर माता, वीर पत्नी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान…

       कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मा‌.खा. डॉ. अशोकजी नेते आणि लायङ्स अँड मेटल्सचे डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आले.

           या कार्यक्रमाला ,गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार चव्हाण, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिडुरकर सर, वीर पत्नी सुधाताई चंदनखेडे, संघचालक घिसुलाल काबरा, सामाजिक नेते चंद्रशेखर भडांगे, नंदुभाऊ कुमरे, उदय धकाते, सुभेदार ऋषी वंजारी, वालोदेजी, हवालदार महादेव वासेकर, हवालदार ईश्वर राऊत, गिरडकरजी, देशमुख, यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

          कार्यक्रमाची सांगता “महाराष्ट्र गीत” आणि “राष्ट्रगीत” गात संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. वीर जवानांच्या त्यागाची आठवण ठेवत, कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

“शौर्याला मान आणि बलिदानाला सलाम!”

“वीर शहीदांच्या चरणी कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करत, संपूर्ण देशाच्या वतीने एकच आवाज – जय हिंद! वंदे मातरम्!”