Home Social शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्य चंडिकापूर येथे उद्या भव्य नेत्र व रोगनिदान शिबीर,तालुकाप्रमुख...

शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्य चंडिकापूर येथे उद्या भव्य नेत्र व रोगनिदान शिबीर,तालुकाप्रमुख प्रमोद धनोकार यांचे आयोजन….

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

         शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारे, राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य चंडिकापूर येथे भव्य नेत्र व रोगनिदान शिबिराचे आयोजन पक्षाचे तालुकाप्रमुख प्रमोद धनोकार यांनी केले आहे.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख पराग गुडधे, उदघाटन दर्यापूरचे आमदार गजानन लवटे तर प्रमुख उपस्थिती महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सौ. प्रतिभाताई बोपशेट्टी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ ज्योतीताई औगड, जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र दिपटे, दर्यापूर विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, दर्यापूर तालुका संघटक गुणवंत गावंडे, दर्यापूर तालुका समन्वयक किशोर टाले उपस्थित राहणार असून या नेत्र व रोगनिदान शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.