उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
भिसी येथे एका लग्नसमारंभात आलेल्या काही युवकांनी बिअरबार मध्ये आपसातच वाद घातला.थोड्यावेळात वादाचं रूपांतर हाणामारीत झाले.
दरम्यान पोलीसांची गाडी आली व वाद घालनाऱ्या युवकांना पोलीसांनी गाडीत बसन्यास सांगीतले.परंतू काही युवकांनी पोलीस गाडी चालक शिपाई मनोज गायकवाड यांना मारहान करण्यास सुरवात केली.
पोलीस शिपायाला होणारी मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या पत्रकार पंकज मिश्रा यांना सुद्धा दारूड्या युवकांनी धक्काबुक्की केली.
काही वेळात ठाणेदार रवीन्द्र वाघ व अन्य पोलीस शिपाई घटना स्थळावर आले व पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या युवकांना अटक केली.
सवीस्तर वृत्त याप्रमाणे आहे की भिसी येथील मुलीच लग्न पेंढराबोडी ता.भिवापूर येथील युवकाशी जुळले.आज घटी मुहुर्तावर लग्न लावण्याचे ठरले.
वर मुलगा आपल्या इस्ट मित्रांसह लग्नची वरात घेऊन भिसीला वधू मंडपात आला.लग्न लगले,जेवणाच्या पंगती सुरू झाल्या.दरम्यान वर पक्षातील काही युवक येथील प्रभाग क्र. 9 मधील आशीश बिअर बार मध्ये येऊन मद्यप्राशन करीत बसले.
त्यांच्यामध्ये आपसातच वाद सुरू झाला व थोड्या वेळात बारसमोर रस्त्यावर येवून एक दुसऱ्याला अश्लील शब्दात शिवीगाड करून हाणामारी करू लागले.
काही वेळात बिअर बार चालकाने येथील पोलीस स्टेशन ला फोन करून माहीती दिली व लगेच पोलीस गाडी घटना स्थळावर दाखल झाली.
पोलीस शिपाई चालक मनोज गायकवाड यांनी हाणामारी करणाऱ्या युवकांना गाडीत बसन्यास सांगताच त्यांनी पोलीस शिपायाला मारहाण करण्यास सुरवात केली.
दरम्यान पत्रकार पंकज मिश्रा हे आपल्या कापड दुकानामधून सर्व घटना बघत होते.यांनी मध्यस्थी करून घडणारा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली.
नंतर पंकज मिश्रा यांनी लगेच पोलीस ठाण्यात जाऊन थानेदार रवी वाघ यांना माहीती दिली. वाघ यांनी लगेच अन्य पोलीस शिपायांसह घटना स्थळ गाठून पोलीसांना मारहान करणाऱ्या युवकांना अटक केली.
पोलीसांनी अशीश बिअर बार चे सिसीटीव्ही तपासुन घटना स्थळावरून फरार झालेल्याइतर युवकांना सुध्दा अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची संख्या १० झाली आहे. १) विकास गोपाल नंदुरकर व 33 वर्ष २) मनीष उर्फ शिवम लक्ष्मण गजपुरे वय 19 वर्ष ३) विनोद उर्फ सर्वेश सुरेश ढोमणे वय 26 वर्ष ४) होमराज सुधाकर ढोमणे वय 23 वर्ष ५) स्वप्निल अमृत करंडे वय 26 वर्ष ६) संदीप अमृत करंडे व 29 वर्ष ७) मुन्ना राजू बाळबुदे वय 24 वर्ष ८) साहिल ज्ञानेश्वर भूडे वय 25 वर्ष ,सर्व राहणार पेंढराबोडी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर ९) सूर्यभान ईश्वर चौधरी वय 39 वर्ष राहणार दुर्गापूर शाळेजवळ वार्ड नंबर सहा तालुका उमरेड जिल्हा नागपूर १०) विधी संघर्ष बालक नामे नैतिक लक्ष्मण गजपुरे वय 16 वर्ष राहणार पेंढराबोडी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर हे असुन त्यांच्यावर अपराध क्रमांक 54/25 कलम 132, 121(1),189,190,191(2),351(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपींना अटक करण्यात आली.
तदनंतर त्यांना पोलीस कोठडी रिमांड कामी न्यायालयात हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास भिसी चे थानेदार जितेन्द्र चांदे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुकेश धोबळे व पो.उप.रवी वाघ हे करीत आहे.
अटक झालेल्या युवकांमध्ये काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती आहे.
*****
बॉक्स….
येथील प्रभाग क्र. 9 मध्ये जयस्वाल यांच्या मालकीचे आशीश बिअर बार व देशी दारूचे दुकान आहे. या दोन्ही ठिकानी पार्कींग व्यवस्था नाही. इथे येणारे दोन चाकी व चारचाकी वाहण रस्त्यावरच उभे असतात त्यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.
ड्राय डे च्या दिवशी सुद्धा येथून मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री केल्या जाते व या बार नेहमीच अल्पवयीन मुल दारू प्यायला जातात व दारूचा खप वाढावा यासाठी बार मालक त्यांना दारू विकतात हे विशेष.
गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे कार्य पोलीस विभागाचे असते.परंतु आज वाद मिटवायला गेलेल्या पोलीस शिपाई सोबत झालेली मारहाण ही निंदनीय.
पंकज मिश्रा.
भिसी.
*******
विशेष...
आरोपींना वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारून 9 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली व एका अल्पवयीन आरोपिची बालसुधार गृहात रवानगी केली.



