दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील ज्ञानसागर मंगल कार्यालयात मराठा सोयरिक संस्थेच्यावतीने रविवारी (दि.२७) सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा ९८वा इच्छुक वधु वर परिचय मेळावा मोफत स्वरूपात आयोजित केला असल्याचे आयोजक प्रभाकर कड व आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी सांगितले.
याबाबत शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, सेवानिवृत्त वनअधिकारी प्रभाकर कड, मराठा सोयरिक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी नियोजन केले आहे. मेळाव्यासाठी येताना विवाहेच्छुकांनी सोबत आधार कार्ड, बायोडाटा आणि पालकांना सोबत आणावयाचे आहे.
समाजातील विवाहेच्छुंची गरज ओळखून आमच्या संस्थेमार्फत आतापर्यंत ९७ मेळावे यशस्वी केले आहेत. आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक जणांचे सोयरिक जमवले आहे. यामध्ये विधवा, विधुर, घटस्फोटीत अशा साडेसहाशे जणांचे लग्न जमवले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी दिली.



