योजनांचा लाभ घेऊन विकास साधा:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम… — देवदा येथे ‘शासकीय योजनांची जत्रा’ संपन्न… — बोलेपल्ली साजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

मुलचेरा:-महाराजस्व अभियानातून शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणासाठी योजना राबविल्या जात आहेत.या योजनांची माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.

         मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम देवदा येथे तहसील कार्यालय मार्फत 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजास्व अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम,प्रभारी तहसीलदार सर्वेश मेश्राम,नायब तहसीलदार राजेंद्र मेश्राम,नायब तहसीलदार करिष्मा चौधरी,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,संवर्ग विकास अधिकारी एल.बी.जुवारे,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,विस्तर अधिकारी मनोहर रामटेके, कृषी अधिकारी (पंचायत) युवराज लाकडे,लक्ष्मण येर्रावार,देवदाचे सरपंच केसरी पाटील तेलामी,वेंगनूरचे सरपंच नरेश कांदो,बोलेपल्लीचे सरपंच गणेश हलामी,देवदाचे उपसरपंच संतोष तुमरेटी,आदी मान्यवर उपस्थित होते.

       पुढे बोलताना मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर,बोलेपल्ली आणि देवदा ही तिन्ही ग्रामपंचायत अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात.या परिसरातील नागरिकांना कार्यालयीन कामासाठी तालुका मुख्यालयात येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.बोलेपल्ली आणि देवदाची परिस्थिती ठीक असलेतरी वेंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावातील नागरिकांना अजूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अश्या अभियानातून नागरिकांना नक्कीच विविध दाखले,प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे.देवदा सारख्या भागात शासनाने महाराजस्व अभियान घेऊन या भागातील नागरिकांना एकाच मंचावर योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला, खरच अभिमानास्पद असल्याचे मत भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले.

        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.प्रभारी तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी प्रस्ताविकेतून विविध योजनांची माहिती देताना मागील 15 दिवसांपासून मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांनी घरोघरी भेट देऊन नागरिकांना लागणाऱ्या आवश्यक दाखल्यांची माहिती घेतल्यानेच मोठ्या प्रमाणात दाखले आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.नागरिकांनी सुद्धा शिबिराला चांगली उपस्थिती दाखवली आणि योजनांचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमनी चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.तर,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

दहा कुटुंब झाले दाखला मुक्त

शिबिरात सर्व विभागाकडून स्टॉल लावून विविध योजनांची माहिती दिली.महसूल विभागाकडून ज्या नागरिकांकडे जे दाखले नाहीत.त्यांची यादी करून परिपुर्ण दाखले तयार करून तब्बल दहा कुटुंबांना संपूर्ण दाखले असलेले किट वाटप करून दाखला मुक्त कुटुंब करण्यात आले.