Home Social महिलांसाठी मासिक पाळी विश्रांतीगृहाचे उद्घाटन उत्साहात…

महिलांसाठी मासिक पाळी विश्रांतीगृहाचे उद्घाटन उत्साहात…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

         धानोरा तालुक्यातील चव्हेला येथे आदिवासी महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या मासिक पाळी विश्रांतीगृह प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा २५ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.

         या उद्घाटन प्रसंगी उमेद प्रभाग समन्वयक सुधीर ठेंगरी, युवा परिवर्तन मॅनेजर प्रशांत मंडावर, मिथुनजी हुलके, डॉ. भूषण कुकुडकर, राकेश उईके, दुरुजी धुर्वे पाटील, चव्हेला ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक बढई, प्रविण रामटेके, सचिन दुधपचारे तसेच युवा परिवर्तन तालुका समन्वयक अनिकेत गुरनुले आदी मान्यवर उपस्थित होते.

         मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर करून महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, तसेच सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

          दी टाईम अँड टॅलेंट व युवा परिवर्तन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यात आतापर्यंत आदिवासी महिलांसाठी पाच मासिक पाळी विश्रांतीगृहे यशस्वीरित्या उभारण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे महिलांना सुरक्षित, स्वच्छ व सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होत असून समाजात सकारात्मक बदल घडविण्यास हातभार लागत आहे.