उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे,पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य,आणि चिमूर तालुकासह चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ई-मेल द्वारे दिनांक २५ फेब्रुवारीला तक्रार करण्यात आली होती.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून ई-मेल तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेतल्या गेली व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,महसूलमंत्रालयातील सचीव,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका,चिमूर विभाग उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर विभाग एसडिपिओ दिनकर ठोसरे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे,भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांना चिमूर तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सुचना करण्यात आली.
राष्ट्र कॅडरच्या १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनीषा पाटणकर म्हैसकर यांना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात सदर पदभार सांभाळला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ ला तक्रारदारांचे पत्र ई-मेल द्वारा पाठवून महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा मिलींद म्हैसकर यांनी चिमूर तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.



