जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ कार्यकारी अध्यक्षपदी प्रदीप रामटेके यांची नियुक्ती… — कर्तव्यक्षम व्यक्तीची नियुक्ती.. — विदर्भात संघटना मजबूत होणार..

    अमान कुरैशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

        एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे यांनी,विदर्भ प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी प्रदीप रामटेके यांची नियुक्ती केली आहे.

         प्रदीप रामटेके हे सामाजिक परिस्थितीचे जाणकार असून त्यांनी आजपर्यंत विविध संघटना अंतर्गत प्रभावीपणे व परिणामकारक असे न्यायसंगत कार्य केले आहे.

      प्रदीप रामटेके यांच्या कार्याची कार्यपद्धत निर्भिड,निष्पक्ष असून खुली आहे.ते कुणाच्याही दबावात न येता वास्तविक परिस्थितीला अनुसरून कार्ये करीत राहतात व कर्तव्य पार पाडतात.

          तद्वतच पत्रकारिता क्षेत्रातील २० ते २५ वर्षांचा त्यांचा अनुभव अनेकांना मार्गदक ठरला व योग्य दिशा देऊन गेला.

         त्यांची वकृत्व व लिखान शैली दांभिक प्रवृत्तीची नाही.ते निर्भिड बोलतात आणि लेखणीच्या माध्यमातून निष्पक्ष मांडणी करतात.

            ते दखल न्युज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक आहेत व आमच्या सारख्या पत्रकारांचे मार्गदर्शक आहेत.

          सामाजिक परिस्थितीची आणि राजकीय अनुभवाची त्यांना जाणीव असल्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विदर्भात संघटनेचे जाळे प्रत्येक तालुका स्तरावर पसरविणार आहेत.

       विदर्भात एन.जागतिक मानवाधिकार संघटनेची मोठी ताकद निर्माण करुन शोषित,वंचित, पिडीत,अन्यायग्रस्त,अत्याचारग्रस्त,नागरिकांसाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत कार्ये करतील व कर्तव्य पार पाडतील असीच त्यांची भूमिका असणार आहे.

           प्रदीप रामटेके सरांचा सर्वांना सोबत घेऊन चालणारा व सर्वांना मानसन्मान देणारा स्वभाव,पुढे चालून “संघटनेची ताकद असेल,असे म्हणणे चुकीचे नाही. 

          ते वरिष्ठांचे नेहमी मार्गदर्शन घेतात व उत्तम आणि योग्य विचारांना स्विकारीत न डगमगता व विचलित न होता खंबीर पणे संघटनेला मजबूत करतात असेही यापुर्वीच्या त्यांच्या कार्यावरुन लक्षात आले आहे.

           व्यक्तीश: स्वाभिमान आणि अस्मितेला ते खूप महत्त्व देतात,त्यांच्या स्वाभिमान व अस्मितेला धक्का लागतो आहे, असे त्यांच्या लक्षात आले की पदाचा राजीनामा देऊन ते मोकळे होतात.अर्थात ते पद सोडण्याचा विवेक बुध्दीने निर्णय घेतात..

        ते मनमिळाऊ स्वभावाचे असून विपरीत परिस्थितीत कसे कार्य करायचे हे त्यांना चांगलेच माहीत आहे.परत त्यांच्या कार्यालयीन पत्रव्यवहार हा परिणामकारक असतो.

            ते हालचाली वरुन पुढील भुमिका ओळखतात व योग्य दिशा घेणारा निर्णय घेतात.यामुळे विदर्भात एन.जागतिक मानवाधिकार संघटना ही येणाऱ्या काळत वैचारिक शक्तीशाली असेल असे वाटते आहे.