Home Social मौजा सोन्सरी येथे विविध ठिकाणी प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा..    

मौजा सोन्सरी येथे विविध ठिकाणी प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा..    

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी

        मौजा सोन्सरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरपंच सौ.मीनाक्षी वटी यांच्या हस्ते धोजाऱ्हान करण्यात आले.

            या राष्ट्रीय दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच झुनुकलाल चौधरी,ग्रामसेविका सौ.रामटेके मॅडम,श्री.जयन प्रधान,सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.   

        या कार्यक्रमाला आवीका सोन्सरी येथील संचालक कर्मचारी यांच्यासह जि.प.शाळा येथील कर्मचारी,ग्रामीण विकास विद्यालय शाळा येथील कर्मचारी उपस्थित होते.

          विद्यार्थी मुला-मुलींनी देशावर आधारित गाणी म्हटले.त्यानंतर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्याधापक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

           विद्यार्थी मुला-मुलींनी देशभक्ती गीते सादर केली.याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.