भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
युवकांच्या ऊर्जेला आणि ग्रामीण संस्कृतीच्या जिवंत परंपरेला व्यासपीठ देणारा आरण्यदिप युवा सांस्कृतिक महोत्सव दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय, धानोरा येथे थाटामाटात पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाने संपूर्ण महाविद्यालय व धानोरा परिसर सांस्कृतिक जल्लोषाने दुमदुमून गेला.
महोत्सवाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल यांनी भूषविले, उद्घाटन प्रसंगी उद्घाटक – अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे सहायक पोलिस अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा प्रमुख अतिथी -प्राचार्य आनंद मधुपवार, डॉ.किरमीरे,डॉ.चुदरी, डॉ. लांजेवार, डॉ.चव्हाण, डॉ.मुरकुटे,प्रा.बनसोड, प्रा.वाळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. उदय थुल यांनी युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे ठाम मत व्यक्त केले. संस्कृती ही समाजाची ओळख असून ती जपण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी हिरडे यांनी आपल्या प्रभावी भाषणात शिस्त, संस्कृती आणि सामाजिक भान यांचा समतोल राखणारा युवकच खरा राष्ट्रनिर्माता असल्याचे स्पष्ट केले. युवकांनी सकारात्मक मार्गाने आपली ऊर्जा वापरावी, असे आवाहन त्यांनी केले.
महोत्सवात सादर करण्यात आलेल्या लोकनृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलाप्रदर्शनाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.विध्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
आरण्यदिप युवा सांस्कृतिक महोत्सव हा केवळ कार्यक्रम न राहता, ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना उभारी देणारी चळवळ ठरत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नागरिकांची मोठी उपस्थिती ही या महोत्सवाच्या यशाची साक्ष ठरली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.वीणा जंम्बेवार,प्रास्ताविक प्रा प्रशांत वाळके, यांनी तर आभार डॉ.पुण्यप्रेडडीवार यांनी केले. यावेळी डॉ.वाघ, डॉ.झाडे, डॉ.सचिन धवनकर, डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा.मांतेश तोंडरे, डॉ.प्रवीण गोहणे, प्रा.खोब्रागडे, डॉ.भुरसे, प्रा.खोब्रागडे मॅडम, प्रा.करमणकर, प्रा.रणदिवे, प्रा.आवारी, प्रा.वटक तर प्रशासकीय कर्मचारी मनोज नन्नावरे, गणेश लांबट, भास्कर कायते, हरीश्चंद्र गोहणे,संदीप मानापुरे,बोनगीरवार,बालाजी राजगडे, भास्कर वाढणकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.यावेळी सांस्कृतिक विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



