मी संघाला गाढायला लागलो, हे मला गाढायला लागले.:-एड.प्रकाश आंबेडकर.. — यांना कारागृहात जायचे आहे.. — अन् अंजलीताई प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

           ही वेळ वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नसून मुजोर व हुकुमशहा विचारसरणीच्या मोदीला हटविण्याची आहे.जो सर्व बहुजनांना धक्का लागू न देता गिळंकृत करतो आहे.म्हणून मी दोन पाऊले माघारी जात महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायला तयार आहे.मात्र मी संघाला गाढायला लागलो असताना हे मलाच गाढायला लागले आहेत,असा गंभीर आरोप अँड.प्रकाश आंबेडकरांनी नागपूरच्या विशाल स्त्री मुक्ती दिन परिषद व मनुस्मृती दहन दिन शोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला आहे.

          नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आज स्त्री मुक्ती दिन परिषदेचे व मनुस्मृती दहन दिन शोहळ्याचे विशाल आयोजन वंचित बहुजन आघाडी नागपूर तर्फे करण्यात आले होते.या स्त्री मुक्ती दिन परिषदेचे व मनुस्मृती दहन दिन शोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर हे होते तर महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर,सौ.अंजलीताई प्रकाश आंबेडकर आणि इतर मान्यवर हे मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.

         नागपूरच्या स्त्री मुक्ती परिषदे अंतर्गत उपस्थित असलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधतांना अँड.प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सुत्रधारांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुत्रधारांना उद्देशून म्हणाले,”मी संघाला गाढायला लागलो,हे मला गाढायला लागले.एड.प्रकाश आंबेडकर इशारा देताना व सतर्क करतांना म्हणाले यांना कारागृहात जायचे आहे म्हणून सन २०२४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत हे वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला तयार नाहीत.

          राजकीय स्थिरतेचे आणि अस्थिरतेचे मनसुबे स्पष्ट करताना अँड.प्रकाश आंबेडकर म्हणाले विभक्तपणा हा वर्चस्व निर्माण करतो व तो टिकवून ठेवतो.मात्र यातून मानसिक गुलामी पत्करली जाते‌.एकोप्याने मजबूत शक्ती तयार होते,पुढे येते.याचबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे की समानतेचा भाव हा संघर्ष करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो,यात लहान व मोठेपणा मनात रुजत नाही.

           यांना पक्ष उमेदवार पाडायचे आहेत (यांना पक्ष घालवायचा आहे) की मोदीला घालवायचे आहे याचा विचार त्यांनी करावा आणि वेळ न दवडता लोकसभा व विधानसभेच्या जागा आतापासूनच पाटप कराव्यात.जागा वाटपात एक दोन ईकडे तिकडे होतील यात मोठी बाब नाही असा सल्ला सुध्दा अँड.प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना दिला.

         मोदी फेफडा आहे बाकी काही नाही.तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्हाला भेजा देण्यास तयार आहे.नाव न घेता भाजपाला उद्देशून अँड.प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यांनी बोट ठेवले तर तुम्ही बोट ठेवायला शिका!.(काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुचना),”घाबरता कशाला?

            पक्ष पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिशा देताना अँड.प्रकाश आंबेडकर म्हणाले फालतुगिरी बंद करा व उमेदवार जिंकण्यासाठी कामाला लागा‌.उमेदवार नाही आला तरी मी उमेदवार आहो असे समजून पक्षाच्या उमेदवारांकडे मत्ते वळवा आणि आपले उमेदवार जिंकून आणा,असा आत्मविश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांत व कार्यकर्त्यांत त्यांनी भरला..

             फुले-शाहू-आंबेडकर विचारवादाची क्रांती जिवंत आहे तोपर्यंत आपण आहोत असे समजा असे संबोधतांना अँड.प्रकाश आंबेडकरांनी सर्व समाज घटकातील नागरिकांना सचेत केले.

            आजच्या स्त्री मुक्ती परिषदेत वंचितच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर,प्रमुख मार्गदर्शक अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी तर प्रत्येक काळातील जुलमी कार्यपद्धतीची व अन्यायकारक गुलामीची आठवण करून देणारे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.अंजलीताई प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईचा संघर्ष ताजा केला.

          याचबरोबर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनाची संधी देण्यात आली होती.

           स्त्री मुक्ती दिन परिषदेला व मनुस्मृती दहन दिनाच्या शोहळ्याला लाखो आयाबहिनींची व बांधवांची उपस्थिती हे सांगत होती की,”महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना आम्ही सुरक्षित ठेवायसाठी तयार आहोत.