ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली जिल्ह्यातील गटा–हेडरी जिल्हा परिषद मतदारसंघात आजाद समाज पार्टीने आपली राजकीय जोरदार उपस्थिती दाखवण्याचा निर्णायक निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून पक्ष स्वत:चा अधिकृत उमेदवार उभा करणार असून, काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी सारख्या स्थापित पक्षांना कडवी आणि थेट टक्कर देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
पक्षात झालेल्या सखोल बैठका आणि संघटनात्मक चर्चेनंतर, गटा–हेडरी क्षेत्रात प्रत्येकी सक्षम, स्थानिक आणि समाजमनाचा उमेदवार निवडण्यासाठी तीन संभाव्य नावांची गंभीर चर्चा करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवरील सूचनांवर, समाजातील विविध घटकांशी संवाद साधल्यानंतर पुढील 8 दिवसांत अधिकृत उमेदवार जाहीर केला जाणार आहे. सध्या महेंद्र उसेंडी यांच्याकडे प्रभार देऊन त्याना भेटीगाटी करण्याचे निर्देश पक्षाने दिले असून दरम्यान मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे उसेंडी यांनी सांगितले.
आजाद समाज पार्टीने यावेळी एक महत्वाचा आणि आदर्शवत निर्णय घेतला आहे…
पक्षाच्या ध्येय-धोरणांवर निष्ठा ठेवून सातत्याने काम करणाऱ्या तरुणांना संधी देणे!
स्थानिक समस्यांशी थेट नाळ जुळणाऱ्या, जनतेतूनच उभे राहिलेल्या आणि प्रामाणिकपणे क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा पक्षाचा ठाम निर्धार आहे.
पक्षाच्या स्थानिक नेतृत्वापासून ते जिल्हा पातळीवरील जबाबदारांपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, गटा–हेडरी मतदारसंघात बदलाची हवा निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.



