अमान कुरेशी
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
चंद्रपूर :- शहरातील सलग वाढत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा बसवत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अट्टल चोरट्याचा पर्दाफाश केला आहे. दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रतिक उर्फ राहुल वनराज झाडे (वय ३५, रा. महाकाली कॉलरी) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तब्बल ०८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
०४ मोटार सायकली + ०४ देवस्थान/चर्च/विहारातून चोरी तपासादरम्यान आरोपीने पोस्टे रामनगर, इमामवाडा (नागपूर), चंद्रपूर शहर हद्दीतील विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. विशेषतः धार्मिक स्थळांना लक्ष्य करत त्याने खालील ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले.
हनुमान मंदीर – दादमहल वार्ड, चंद्रपूर
लक्ष्मी नारायण मंदीर – मेन रोड, चंद्रपूर
संत अंदिया चर्च – जयंत टॉकीजजवळ, चंद्रपूर
दिशाभूमी बौद्ध विहार – डॉ. आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर
जप्त मुद्देमाल – एकूण ₹५,३०,०००/-
कारवाईदरम्यान आरोपीकडून खालील माल जप्त…
• Honda Activa (MH34-AS-8353) – ₹50,000/-
• Honda Shine (MH27-CK-7050) – ₹70,000/-
• Royal Enfield Bullet (MH31-AS-EX-2471) – ₹3,00,000/-
• Yamaha R15 (MH49-B-0358) – ₹50,000/-
• Realme 11X 5G – ₹20,000/-
• OPPO A17 – ₹20,000/-
• POCO C61 – ₹20,000/-
एकूण किंमत : ₹५,३०,०००/-
कारवाईत सहभागी अधिकारी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक प्रभावी कामगिरी…
या कारवाईमुळे शहरातील सलग चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कार्याची प्रशंसा केली आहे.

