आम्हीच ( भारतीय जनता ) आमचा देश अवघ्या 75 वर्षात बरबाद केला…….!
“आम्हाला ( भारतीय जनतेला ) एक कायमस्वरूपी मानसिक रोग जडलेला आहे………!”
तो हा की…….
“आम्ही आमच्या जन्म दात्या माता – पीत्याचं ऐकणार नाही, त्यांनी सांगितलेलं करणार नाही…….”
त्यांनी माझ्या भल्यासाठी किती संघर्ष करून खस्ता खाल्ल्या याची जाणीव आम्ही ठेवणार नाही……!
“आम्ही आमच्या आदर्श महापुरुष/ तत्ववेत्ते यांनी सांगितलेलं ऐकणार नाही आणि तसं करणारही नाही……”
त्यांनी मानवी कल्याणासाठी सर्वस्व अर्पण करून आम्हाला स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचे काहीही घेणे – देणे आम्हाला नाही……!
हा परंतु………
एक मात्र आम्ही निश्चित करणार की आमच्या राजकीय नेत्याने ( आजी / माजी :- ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, पं. स. सदस्य,पं. स. सभापती, जि. प. सदस्य, जि. प. सभापती, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री ) जे जे सांगेल, ते ते आम्ही करणार……
ते मग केवळ आमच्या ( स्वतःपुरते / कुटुंबापुरते ) क्षुल्लक आणि तात्पुरत्या लाभाचे असले की, बस…….
त्यासाठी आम्ही प्रसंगी आई – वडील, बहीण, भाऊ, मित्र, समाज, राज्य, देश यांना फसवणे, यांचा खून करण्यापर्यंत जरी जावं लागलं तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही…….
असा मानसिक रोग आम्हाला जडलेला आहे……!!!
आणि हे विष कालवण्याचं काम केवळ आणि केवळ कुटनीतीच्या राक्षसाने केलेलं आहे. याचा निर्माता केवळ आणि केवळ बाहेरून आलेला आर्य अर्थात आताची ब्राम्हण्य वृत्ती आहे…….!
यांनी आमच्यात आणि कधीच नसलेली काल्पनिक दैवी आणि देव / देवतेची कुसंस्कृती 5000 वर्षांपूर्वी पेरली. तीच्या जाळ्यात आम्ही अलगद अडकलो. आणि तिलाच आमचे कर्ते – धर्ते समजून तिच्यातच अनेक पिढ्या घालून कायमचे मानसिकदृष्ट्या उध्वस्त होण्याचा जणू काही विडाच उचलला. असा इतिहास आम्ही निर्माण केला.
या मानसिक रोगामुळे आम्हाला, खरं – खोटं, सत्य – असत्य, कुशल – अकुशल, चांगलं – वाईट, यामध्ये आम्हाला भेदच आजपर्यंत करता आला नाही. कधी अलिप्त होऊन तसा विचारही आम्हाला करता आला नाही. तशी उसंतच आम्हाला मिळू दिल्या गेली नाही.
या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी अनेक,महापुरुष आणि संतांनी ( तथागत भगवान बुद्ध, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत कबीर , संत तुकाराम संत गाडगेबाबा, इ. ) प्रयत्न केले. अनेक समाजसुधारक आणि समाज क्रांतिकारक ( म. बसवेश्वर, म. फुले दाम्पत्य, राजाराम मोहन रॉय , छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इ. ) यांनी सुद्धा प्रयत्न या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जीवनभर संघर्ष करून केले……..!
परंतु , यांना आम्ही ( मनुवादी कुसंस्कारामुळे )आमच्या घरातील प्रतिमेत, सार्वजनिक फुकटच्या जागेतील स्मारकात, पुतळ्यात बंदिस्त करुन उपकार फेडले…..!
याच मनुवादी कुसंस्कारामुळेच, मानसिक रोगामुळेच आम्हाला या मंदिरातील देवांच्याही, विहारातील बुद्धाच्याही, मजिदीतील अल्लापेक्षाही, गुरुद्वारातील गुरु ग्रंथ साहेबापेक्षाही, चर्चमधील येशू पेक्षाही, मोठे हे नितिभ्रष्ट राजकारणी नेते आम्हाला वाटायला लागतात.
यांच्यापुढे मी, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझा समाज, माझे राज्य, माझा देश हे सर्व कवडीमोल दिसायला लागतं.
सर्वकाही आणि सर्वस्वी हेच आमच्या जीवनाचे व देशाचे शिलेदार समजून गेली 75 वर्षे घातली.
आणि याच मानसिक रोगातून कायमचे बाहेर काढण्यासाठी……
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली……
त्यासाठी त्यांनी संविधान आणि लोकशाहीला…….
विभूतीपूजा कशी मारक होती आणि आहे. याचे ऐतिहासिक पुराव्या नुसार दाखले दिले. आमच्या या आंधळ्या श्रद्धेतून या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या प्रति कशी विभूतीपूजा निर्माण होऊन आमचा कसा घात करते. याचा इशाराही त्यांनी दिला.
त्यांनी या राजकारण्यांची व्याख्याच सांगितलेली आहे……..
नरम , गरम आणि बेशरम तोच राजकारणी.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
असे एवढे सांगून सुद्धा आम्ही आज याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो.
आणि म्हणूनच……….
आज आम्हाला……..
EVM प्रधानमंत्री मोदी / शहा, मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, भुजबळ इत्यादी ही सर्व मंडळी आम्हाला आमचे भाग्यविधाते भासतात. भलेही त्यांनी देशाची व राज्याची कितीही कर्जबाजारी करून वाट लावो, अथवा देश गहाण ठेवो, आम्हालाही आमच्या कुटुंबासहीत विको. आम्हाला त्याचे काहीही वाटणार नाही आणि काही घेणे – देनेही नाही. उलट आम्ही त्यांच्या हाकेला ओ देण्यास नेहमी तयार असू……..!
याच मानसिक रोगातून गेल्या 75 वर्षात कुणीही मुक्त झालेले नाही ( स्वतः लेखक सुद्धा ), आंबेडकरी अर्थात बौद्ध समाज सुद्धा ( जो स्वतः ला इतरांपेक्षा वेगळा आणि सुशिक्षित समजतो), किंवा आणखी कुणीही असा दावा करणारा समूह असो, देखावा मात्र अती प्रमाणात करतो………!
परंतु , मेंदूच्या कोपऱ्यात मात्र ही अंधश्रद्धा आणि विभूतीपूजा कुठेतरी लपून कार्यरत असते…….
या विकृतीवर कोणत्याही शिक्षणातून मिळालेल्या पदवीने मात्र मात केली नाही. उलट तीला खतपाणी घालण्याचेच काम त्या शिक्षणाने केले.
या विकृतीनेच आपल्या आदर्श तत्ववेत्ते आणि महापुरुषांना त्यांच्या विचार आणि आचारांना आम्ही कायमचे मारून टाकल्यामुळेच…….
आम्हीच आमच्या देशाला बरबाद करण्यास कारणीभूत ठरलो……!



