पारशिवनी तालुका अंतर्गत मौजा बीटोली येथे राबविण्यात आलेल्या “राजेंद्र मुळक सहायता कक्ष आपल्या दारी” या आरोग्य शिबिराला ग्रामवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

     पारभिवनी::- माजी मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष श्री.राजेंद्र मुळक यांच्या संकल्पनेतून आज आरोग्य तपासणी शिबिर मौजा बिटोली येथे घेण्यात आले.

        अनेक वर्षापासून राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून गावातील गरजू लोकांना जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या करीता पारशिवनी तालुका अंतर्गत बीटोली येथे मोफत वैद्यकीय तपासणी,नेत्र तपासणी तथा निःशुल्क चष्मा वाटप इत्यादी आरोग्य तथा शासकीय-निमशासकीय सेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यात आला.

    यामध्ये..

1) वैधकीय तपासणी : 170..

2) ईसीजी चेकप : 19..

3) मोतियाबिंदू : 28..

4) चष्मा वाटप : 128..

5) आयुष्यमान कार्ड : 76…

6) ई-श्रम कार्ड : 9..

7) पॅन कार्ड : 6..

8) राशन कार्ड : 1..

        इत्यादी सेवांचा नागरिकांनी या शिबिरात लाभ घेतला.

         यावेळी श्री.चेतन देशमुख (माजी उपसभापती प.स.परशिवणी), श्री.नरेश चौधरी (माजी सरपंच),श्री.साहेबराव निंबाळकर,श्री.कालिराम उईके,श्री.दत्ताजी निंबाळकर,श्री.इंद्रपाल गोरले,श्री.सुरेश दिवटे,सौ.मीराबाई वाघ,सौ. जिजाबाई वारकर,श्री.प्रकाश सोनेकर,श्री.जयप्रकाश करमकर,श्री.बीराम शेख,श्री.योगेश्वर वारकर, श्री.डॉक्टर चव्हाण,श्री.विनोद कळमकर,सौ.कोमलताई ढोरे, श्री.पंढरी ढोरे तथा गावकऱ्यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.