वराडा येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील वराडा येथे वैशाख बुद्ध पौर्णिमा व अवघ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे..दया, क्षमा, शांततेची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

           कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्राम पंचायत सरपंच सुनिल जामदार, पोलीस पाटील संजय नेवारे यांचा हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात उमेश मेश्राम, राहुल खोब्रागडे, रोशन जामदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन बौद्ध पौर्णिमे च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन केले.

           याप्रसंगी वराडा ग्रा पं माजी सरपंच विद्याताई चिखले, कौशल्या बाई पाटील, ज्योती मेश्राम, अनिता पाटील, सुनिता पाटील, शिला गजभिये, सुरेखा गजभिये, कविता मेश्रा म, मोनिका मेश्राम, शारदा मेश्राम, विद्याबाई रामटेके, अंजली सोमकुवर, प्रचिता पाटील, ऐश्वर्या नेवरे, खुशी मेश्राम, काजल उके, पल्लवी रामटेके, राखी गजभिये, माया गजभिये, शुभांगी पाटील, प्रेरणा पाटील, आचल गजभिये, वेदिका मेश्राम, आराध्या मेश्राम, माहेर इंचुल कर, पुष्पराज मेश्राम, नारायण गजभिये, अक्षय सोम कुवर, शुभम नागमोते, स्वप्निल वरखडे, शुभम मेश्राम, शैलेश गजभिये, मिथुन सोमकुवर, अरविंद मेश्राम, सावन पाटील, शिवदास डोंगरे, खुशाल पाटील, नरेंद्र गजभिये, प्रविण पाटील, योगेश जामदार, अंकित जामदार, वेदांत शेळकी, संदीप कडबे, सचिन पाटील, पिंतांबर मेश्राम, लकी ऊके, प्रणय रामटेके, रामाजी ऊके, विष्णु वाढई सह गावकरी नागरिक उपस्थित होते.