कोळसा खान ब्लॉस्टिंग,दुषित पाणी,डम्पिंग मुळे आणि उंच डोंगराळमुळे नागरिकांचे जिवन धोक्यात… — वेकोलि अधिका-यावर कडक कारवाई करा,अन्यथा जन आंदोलनास सामोरे या ! – प्रकाश जाधव( माजी खासदार)

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – वेकोलि कामठी उपक्षेत्रांतर्गत शासनाच्या सर्व विभागातील सुरक्षेच्या अटी व शर्ती पायदळी तुडवित तानाशाही वागणुकीने कोळसा खानची ब्लॉस्टिंग हाद-याने,दुषित पाणी,धुळ प्रदुषनाने व ओबी डम्पिंगच्या उंच डोंगरामुळे नागरिक त्रस्त असुन जिवितास अनेक धोके निर्माण झाल्याने प्रचंड चिड व असंतोष नागरिकांत खदखदत असल्याने कोळसा खानची ब्लॉस्टिंग,दुषित पाणी,ओबी डम्पिंगचे उंच डोंगराच्या संभाव्य धोक्यापासुन नागरिकाना मुक्त करून संबधि त सर्व विभागाच्या सुरक्षेच्या शर्ती व अटीचे उलघंन करण्यारे तानाशाह श्री.दिक्षित यांचे विरूध्द कडक कारवाई करून शासन करावे अशा प्रकारची मागणी माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केली आहे. 

         येणा-या पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता होणा-या जन आंदोलनास सामोरे या उदभवणा-या दुष परिणामास सर्वश्री आपलीच जवाबदारी राहिल,असे निवेदन ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा व्दारे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात नागरिक आणि शेतक-यांच्या शिष्टमंडळाने मुख्य व्यवस्थापक,वेकोलि मुख्यालय नागपुर आणि विपिनजी इटनकर जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन नागपूर जिल्हा यांना निवेदन देऊन योग्य कारवाई त्वरित करण्याची मागणी केली आहे. 

         वेकोलि कामठी उपक्षेत्रांतर्गत कन्हान परिसरात प्रचंड प्रदुषणाचे साम्राज्य निर्माण होऊन हवेत कोळ सा व मातीचे प्रचंड प्रदुषण वाढले आहे. आजु बाजु च्या १५ ते १८ कि.मी. गाव क्षेत्रातील जमिनी खालील पाणी पातळीपेक्षा जास्त कोळसा उत्खनन असल्याने क्षेत्रातील सर्व पाणी खदान मध्ये प्रवाहित झाले आहे. 

           कोळसा उत्खननाकरिता अति उच्च दाब, जास्त क्षमते च्या ब्लॉस्टिंगने हजारो घराना हादरे बसुन घराच्या भिंतीला भेगा पडुन घरे जिर्ण होत घरे पडुन नुकसान होत कधिही घरे पडुन नागरिकांची जिवहानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. 

            पाण्यात माती, कोळसा व वापरलेले बारूदचे कण मिश्रीत दुषित पाण्यावर कुठ लिही प्रकिया न करता नागपुर जिल्हयाची प्राणवाहु, पिण्याच्या पाण्याचे एकमात्र स्त्रोत कन्हान नदीत सोडुन परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात विष कालवण्याचे पाप वेकोलि अधिकारी करित आहे. 

         परिसरातील सर्व शेती यामुळे नापीकी झाली आहे. मौजा गोंडेगाव खसरा नं. १८० आणि लागुनच्या जमिनी सामोर ओबी डम्पींगच्या नावाखाली मातीच्या टेकडया तयार केल्याने या शेत्या नष्ट झाल्या आहे. या कृत्या मुळे खान सुरक्षा ब्युरो नि टाकुन दिलेल्या नियमाच्या अटी आणि शर्ती पायदळी तुडवल्या आहे.

          अनेक शेत क-यांच्या घेतलेल्या जमिनीच्या करारातील अनेक छोटया मोटया गोष्टीमुळे कराराचे उलघंन करून चार-चार वर्षा पासुन नौक-या दिल्या नाहीत. 

            खान ब्युरोच्या कायद्याप्रमाणे जनतेचे वास्तव असलेल्या ठिकाणा पा सुन १०० मीटरचे सुरक्षा अंतरही सोडले नाही. टेकाडी , शिवनगर, कांद्री, रायनगर, अशोक नगर, धरम नगर व पिपरी या भागातील पाणी वाहुन नेणारा रामेश्वर मोठा नाल्यात ओबी डम्पींगच्या मातीने वेकोलि अधि का-यांच्या गैरकृत्यामुळे छोट्या नालीचे स्वरूप झाल्याने कधीही अनेकांच्या जीवहानीचे कारण बनु शकते.

            खान सुरक्षा ब्युरोच्या नियमा नुसार ९० मिटर पर्यंतच ओबी डम्पींग करावी, दर ३० मीटर ला बेंचींग पध्दत व्हावी आणि वरून खाली पर्यंत उतार ३७.५ मीटर असावा. 

         अश्या सर्व नियमाची पायमल्ली करून मनमानी, हेकेखोरपणे ओबी डम्पींगचे ङोगर उभे केल्याने पावसाळयात वादळ, वा-याने भुस्खलन होऊन अनेक वस्त्या पाणी मातीने भुसपाट होऊ शक ते. या सर्व डोंगरावर वृक्षरोपन ही केले नाही.

          दिवसरात्र या गैरकायदेशीर ओबी डम्पींग मुळे प्रदुर्षित हवा, जमिनीचे प्रदुर्षन, दुषित पाणी, यामुळे प्रचंड रोगराई परिसरात पसरली आहे. या भागातील दवाखाने व रूग्णाची गर्दी हेच याचे प्रमाण असुन आकस्मित मुत्यु चे प्रमाणही वाढले आहे. 

— पर्यावरण विभागाची ईसी (पर्यावरण क्लीअन्स ), 

— महाराष्ट्र राज्य प्रदुर्षन मंडळाच्या कंसेन्टटु स्टॉब्ली समेंट,कंसेन्टटु आपरेट या दोन्ही वेळी टाकुन दिलेल्या अटी व शर्ती.

— डीजीएंमएसच्या कोळसा उत्खनास सुरक्षेच्या टाकलेल्या अटी व शर्ती. 

        शासनाच्या या सर्व विभागातील सुरक्षेच्या अटी व शर्ती पायदळी तुडवित उपक्षेत्र प्रबंधक श्री.दिक्षित यांच्या तानाशाही वागणुकीमुळे जनतेच्या जिवितास अनेक धोके निर्माण झाल्याच्या कृत्यामुळे प्रचंड चिड व असंतोष नागरिकांत खदखदत आहे. 

          संबधित सर्व विभागाच्या सुरक्षेच्या शर्ती व अटीचे उलघंन करण्यारे तानाशाह श्री.दिक्षित यांचे वरच ही जवाबदारी फिक्स करावी आणि तात्काळ त्यांचे विरूध्द कडक कारवाई करून शासन करा. अन्यथा येणा-या पावसाळयाचे दिवस लक्षात घेता होणा-या जन आंदोलनास सामोरे या. उदभवणा-या दुष परिणामास सर्वश्री आपलीच जवाबदारी राहिल. असे निवेदन ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा व्दारे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात नागरिक आणि शेतक-यांच्या शिष्टमंडळाने मुख्य व्यवस्थापक, वेकोलि मुख्यालय नागपुर आणि प्रतिलिपी उपसंचालक,केंद्रिय खान सुरक्षा ब्युरो नागपुर, प्रादेशिक प्रमुख, पर्यावरण विभाग सचिवालय बिल्डींग नागपुर,श्रीमती देशपांडे मँडम प्रादेशिक प्रमुख,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नागपुर,उमेश पाटील वरिष्ट पोलीस निरिक्षक, पो.स्टे. कन्हान,मुख्याधिकारी नगरपरिषद कन्हान-पिपरी,मुख्याधिकारी,नगर पंचायत कांद्री अशा सर्व संबधित अधिका-याशी या ज्वलंत विषयावर प्रत्यक्ष भेटून विषयातील गांभीर्यावर चर्चा केली असुन ई-मेल पाठवुन आणि लेखी निवेदन देऊन सुध्दा कुठलिही दखल किंवा कार्यवाही होत नसल्याने विपिनजी इटनकर साहेब जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यव स्थापन नागपुर जिल्हा ह्यांना निवेदन देऊन त्वरित योग्य कारवाईची मागणी करण्यात आली आहे.